Loksabha Election : शांतिगिरी महाराजांच्या भेटीला उमेदवारांची मंदियाळी

प्रमुख उमेदवार इम्तियाज जलील व संदीपान भुमरे यांच्यासोबत शांतिगिरी महाराजांची बंद दरवाजा आड गुप्तगू
shantigiri maharaj visit mim party candidate imtiyaz jaleel
shantigiri maharaj visit mim party candidate imtiyaz jaleelsakal

खुलताबाद - वेरुळ (ता. खुलताबाद) येथील संत जनार्दन स्वामी आश्रम बुधवारी (ता. आठ) राजकीय आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरला. तो या आश्रमाचे प्रमुख शांतिगिरी महाराजांच्या भेटीसाठी छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघातील निवडणुक लढवित असलेल्या उमेदवारांच्या गाठीभेटीमुळे, संभाजीनगर जिल्ह्यात संत जनार्दन स्वामींना मानणारा जय बाबाजी भक्त परिवार मोठा असल्याने, शांतिगिरी महाराज या परिवाराला कुठला आदेश देतात. ही बाब मात्र गुलदस्त्यात आहे. अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर निर्णय जाहीर करणार असल्याचे आश्रमाचे समन्वयक राजेंद्र पवार यांनी स्पष्ट केले.

shantigiri maharaj visit candidate sandipan bhumre
shantigiri maharaj visit candidate sandipan bhumresakal

तालुक्यातील वेरुळ येथील संत जनार्दन स्वामी आश्रमाचे प्रमुख शांतिगिरी महाराज हे स्वत:नाशिक लोकसभा मतदार संघातुन अपक्ष निवडणुक लढवित आहेत. प्रचाराच्या व्यस्सतेतुन त्यांनी बुधवारी (ता. आठ) आश्रमात आले, याची कुणकुण छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांना लागताच, एका पाठोपाठ उमेदवारांनी आश्रमाकडे धाव घेतली.

सर्व प्रथम एम.आय.एम.चे उमेदवार इम्तियाज जलील यांनी शांतिगिरी महाराजांची भेट घेतली, या दोघांदरम्यान बंद दरवाजा आड गुप्तगू झाली. त्यानंतर शिवसेनेचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी भेट घेत जय बाबाजी भक्त परिवाराचे आशीर्वाद मागितले.

याच ठिकाणी अपक्ष उमेदवार जे.के.जाधव, डॉ. जीवन राजपुत, अपक्ष उमेदवार संजय भास्कर शिरसाठ,शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार भारत संभाजी भोसले यांनी देखील शांतिगिरी महाराजांची भेट घेत आशीर्वाद मागितले.

वेरुळ येथील संत जनार्दन स्वामी आश्रम हा सातत्याने राजकीय घडामेडींचा केंद्रबिंदु असुन, यंदाही लोकसभा निवडणुक प्रचार संपण्याला अवघे तीन दिवस उरलेले असतांना नाशिक लोकसभा मतदार संघाचे उमेदवार शांतिगिरी महाराज व छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदार संघातील उमेदवारांच्या गाठी भेटी, या सर्व घडामोडी बुधवारी (ता. आठ) दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान घडल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com