
शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या लिंबाळा एमआयडीसी मधील राधाजिनिंग प्रेसिंग कापूस कारखान्याला सोमवारी सकाळी ९.३० ते ९.४५ च्या सुमारास अचानक आग लागल्याने आगीचे डोंब लोटले होते
हिंगोली : येथील एमआयडीसी परिसरात असलेल्या राधाजिनिंग प्रेसिंग कापूस कारखान्याला अचानक लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांचा कापूस जळून खाक झाल्याची घटना सोमवारी ता. १८ घडली.
शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या लिंबाळा एमआयडीसी मधील राधाजिनिंग प्रेसिंग कापूस कारखान्याला सोमवारी सकाळी ९.३० ते ९.४५ च्या सुमारास अचानक आग लागल्याने आगीचे डोंब लोटले होते.आग विझविण्यासाठी अग्निशमन बंबाला पाचारण केले, तो बंब येईपर्यंत लोकलच्या पाणी टँकरने कामगारांच्या मदतीने आगीवर नियंत्रण ठेवण्यात आले. त्यानंतर अग्निशमन बंब येताच लागलेल्या आगीवर पाण्याचा फवारा मारल्याने आग आटोक्यात आली.मात्र या लागलेल्या भीषण आगीत जवळपास २३०० ते २५०० क्विंटल कापूस जळून खाक झाला आहे.
तर किमान एक करोड रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज मालकांनी वर्तविला आहे. त्यानंतर तलाठी व पोलीस विभागाला आग लागल्याची माहिती कळताच ते देखील घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मात्र ही आग शॉटसर्किट मुळे लागली की कशामुळे हे अद्याप स्पस्ट झाले नाही. परंतू या लागलेल्या आगीत कापसाचे करोडो रुपयांचे नुकसान झाल्याचे राधा जिनिंग कारखान्याच्या मालकाने सांगितले.
संपादन - प्रल्हाद कांबळे
|