esakal | संतापजनक : प्रेमसंबंधात अडथळा; बारा वर्षीय मुलीला क्रुरतेने संपवले
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

थेट प्रेयसीचे घर गाठून गुरुवारी प्रियंकाची क्रुरतेने हत्या केली. या बाबत शिवाजी कांबळे यांच्या तोंडी फिर्यादीवरून रात्री अकरा वाजता बांसबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीला ताब्यात  घेतले आहे. 

संतापजनक : प्रेमसंबंधात अडथळा; बारा वर्षीय मुलीला क्रुरतेने संपवले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंगोली :  तालुक्‍यातील नांदूसा येथे प्रेम संबधात अडथळा येत असल्याच्या कारणावरून  एका बारा वर्षीय मुलीली क्रुरपणे संपवले. ही घटना गुरवारी (ता. २२ मे) घडली असून या बाबत एका विरुध्द गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.    

या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली तालुक्‍यातील बासंबा पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या नांदुसा येथे गुरूवारी (ता.२१ मे) बाराच्या दरम्‍यान, शिवाजी कांबळे यांच्या घरी बालाजी उर्फ गोपाल प्रेमदास आडे (रा.नांदुसा) आले. त्यांचे प्रियंका शिवाजी कांबळे हिच्या मोठ्या बहिणीशी प्रेमसंबंध होते.

हेही वाचा - औरंगाबाद शिक्षण मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय, कोणता?

प्रियंकाचा त्यांना प्रेमसंबंधामध्ये अडथळा येत होता. त्यामुळे बालाजी उर्फ गोपाल याने चिमुकली प्रियंकाला संपवण्याचा कट रचला. त्याने थेट प्रेयसीचे घर गाठून गुरुवारी प्रियंकाची क्रुरतेने हत्या केली. या बाबत शिवाजी कांबळे यांच्या तोंडी फिर्यादीवरून रात्री अकरा वाजता बांसबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीला ताब्यात  घेतले आहे. 

घटनास्‍थळी पोलीस अधिक्षक योगेशकुमार, अतिरिक्‍त पोलीस अधिक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैजने, स्‍थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरिक्षक जगदीश भंडारवार, बासंबा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक आर. एच. मलपिल्‍लु यांनी भेट दिली असून याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. वैजने हे पुढील तपास करीत आहेत.  

वसमत येथे एकाचा मृत्‍यू 
जमीनीवर पडून डोक्‍याला जबर मार लागल्याने दवाखान्यात उपचारासाठी नेले असता डॉक्‍टरांनी राजू मारोती झुझुर्डे (वय २५) याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या बाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी;  वसमत येथील वडरवाडा भागातील राजू मारोती झुझुर्डे (वय २५) हे गुरुवारी (ता.२१) रात्री आठच्या सुमारास बाहेती जर्दा स्‍टोअर्स यांच्या दुकानासमोर  जमिनीवर पडले.

येथे क्लिक कराच - आनंद वार्ता : हिंगोलीत आणखी पाच रुग्ण कोरोनामुक्त

त्यामुळे त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस जबर मार लागला. त्‍यास डॉ. तांबोळी यांच्या दवाखान्यात उपचारासाठी नेले असता त्‍यांनी तो मयत झाल्याचे सांगितले.  चिमाबाई झुझुर्डे यांच्या फिर्यादीवरून आकस्‍मात मृत्‍यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस निरिक्षक उदय खंडेराय हे करीत आहेत. दरम्‍यान, मृत्‍यूचे कारण काही कळू शकले नाही.