esakal | लोअर दूधना धरणाचे चौदा दरवाजे उघडले,नदीत पाण्याचा विसर्ग सुरु/Lower Dhudana Dam
sakal

बोलून बातमी शोधा

सेलू (जि.परभणी) : लोअर दूधना धरणाचे चौदा दरवाजे उचलून दूधना नदी पात्रात विसर्ग करण्यात येत आहे.

लोअर दूधना धरणाचे चौदा दरवाजे उघडले,नदीत पाण्याचा विसर्ग सुरु

sakal_logo
By
विलास शिंदे

सेलू (जि.परभणी) : तालुक्यातील लोअर दूधना धरण (Lower Dhudana Dam) शंभर टक्के क्षमतेने भरले असून पाण्याची आवक बघता बुधवारी (ता.२९) प्रकल्पाचे द्वार क्र.१, २ , ३, ४, ५, ६, ७ व १४, १५, १६, १७, १८, १९, २० हे चौदा दरवाजे (Selu) उघडण्यात आले आहे. यातून ३०,३२४ क्यूसेक्सने दूधना नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे, कमी करणेबाबत पुढील निर्णय (Parbhani) घेण्यात येणार असून नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे, असे लोअर दुधना प्रकल्प, पूर नियंत्रण कक्षाच्या सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा: येलदरी धरणाचे सर्वच दरवाजे उघडले,नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

वाहतूक ठप्प...

मंगळवारी रात्री लोअर दूधना प्रकल्प धरणाच्या लाभक्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने धरण शंभर टक्के इतके भरल्याने धरणाची चौदा दरवाजे उचलून ३०,३२४ क्युसेसने दूधना नदी पात्रात विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे त्या मार्गावरील सेलू—देवगाव (फाटा), राजवाडी—वालूर हे रस्ते वाहतूकीसाठी बंद झाले आहेत.

loading image
go to top