esakal | येलदरी धरणाचे सर्वच दरवाजे उघडले,नदीपात्रात पाण्याचा विसर्ग/Yeldari Dam Parbhani
sakal

बोलून बातमी शोधा

जिंतूर (जि.परभणी) : येलदरी धरणाचे आता सर्वच दरवाजे दोन मीटर उघडून ८७ हजार ९७.६० क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

येलदरी धरणाचे सर्वच दरवाजे उघडले,नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

sakal_logo
By
राजाभाऊ नगरकर.

.जिंतूर (जि.परभणी) : येलदरी धरणाचे (Yeldari Dam) आता सर्वच दरवाजे दोन मीटर उघडून ८७ हजार ९७.६० क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. उर्ध्व भागातील खडकपूर्णा धरणातून (Khakpurna Dam) मोठ्या प्रमाणात सोडलेला विसर्ग आणि पाणलोट क्षेत्रात होणारी आवक यामुळे येलदरी धरणाच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्याने तीन तासांपूर्वी धरणातून एकूण ५३,६३६.७६ क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला. परंतु आवक वाढतच असल्यामुळे रात्री अकरा वाजता धरणाचे (Jintur) सर्वच म्हणजे दहाही वक्रद्वार दोन मीटर उघडून त्याद्वारे ८४ हजार 393.६० आणि विद्युत निर्मितीद्वारे २७०० याप्रमाणे एकूण ८७ हजार ३९३.६० क्युसेक्स (२४६६.२३ क्युमेक्स) विसर्ग नदीपात्रात (Parbhani) सोडण्यात येत आहे.

.

हेही वाचा: नांदेडमध्ये पुरात अडकलेल्या चौघांना वाचविले

त्यामुळे येलदरी धरण पूरनियंत्रण कक्षाकडुन नदी काठच्या गावांना सावधानता बाळगण्याचा वेळोवेळी इशारा दिला आहे. तरीपण प्रचंड विसर्गामुळे पूर्णा नदीला मोठ्या प्रमाणात पूर येऊन नदीपात्रात मोठी पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. नदीकाठची पिके तर गेल्यातच जमा आहे. शिवाय अनेक गावे प्रभावित होतील.

सावधानतेचा इशारा : मंगळवारी (ता.२८) संध्याकाळी उर्ध्व भागातील खडकपूर्णा धरणातून एक लाख सात हजार ७६९ क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला. त्यामुळे येलदरी व सिध्देश्वर धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा होत आहे. त्यामुळे धरण क्षेत्रात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने येलदरी व सिध्देश्वर धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गात मोठी वाढ होऊ शकते. त्यामुळे नदीकाठच्या गावातील लोकांनी सतर्क राहून नदीपात्रात कोणीही उतरू नये. वाहने, जनावरे सोडू नये किंवा कोणतीही वित्त अथवा जीवितहानी होणार नाही याची काळजी घेण्यासाठी पूर्णा पाटबंधारे विभागाचे (वसमत) कार्यकारी अभियंता यांनी पूरप्रवण क्षेत्रातील गावांना दिला आहे.

हेही वाचा: Aurangabad : औरंगाबादेत ढगफुटीपेक्षा जास्त पाऊस, खाम नदीला पूर

loading image
go to top