लोअर दूधना धरणाची भिंत पाझरू लागल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण

धरण पूर्ण क्षमतेने २०१६ व २०२० या वर्षी भरले होते. उन्हाळ्यात धरणातील पाणी दूधना नदी पात्रातून सोडण्यात येते
lower dudhna dam
lower dudhna damlower dudhna dam

सेलू (परभणी): तालुक्यातील लोअर दूधना प्रकल्प धरणाला चोविस वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या दहा वर्षात धरणाने तीन वेळा पावसाने सरासरी ओलांडली आहे. तर या वर्षीच्या जूलै महिण्यातच धरण शंभरीकडे वाटचाल करताना दिसत आहे. त्यातच धरणाच्या मुख्य भिंतीतून कारंज्या सारखे पाणी बाहेर पडत असल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. लोअर दूधना प्रकल्प धरणाच्या दगडी बांधकामाला १९९७ साली सुरुवात झाली होती. धरण बांधकामासाठी सत्तावीस कोटींचा असलेला हा प्रकल्प हजारों कोटी रूपये खर्च होऊनही अद्याप खरे लाभार्थी धरणाच्या पाण्यापासून वंचितच आहेत.

धरण पूर्ण क्षमतेने २०१६ व २०२० या वर्षी भरले होते. उन्हाळ्यात धरणातील पाणी दूधना नदी पात्रातून सोडण्यात येते. त्यामुळे दूधना नदीपात्राच्या काठच्या गावातील सेलू तालुक्यातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळते. त्याच बरोबर परभणी आणि नांदेड शहराला या धरणातील पाण्याचा फायदा उन्हाळ्यात होतो. धरणाचा डावा कालवा हा ६९ किलोमीटर असून उजवा कालवा ४८ किलोमीटर आहे. धरणातील पाण्यामुळे सेलू, जिंतूर, परभणी तालुक्यातील जवळपास ३४ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र पाण्याखाली यावे, या भागातील शेतकरी आर्थिक समृद्ध व्हावा या उद्देशाने धरण झाले होते. मात्र शासनाच्या बेजबाबदारपणामुळे अजूनही म्हणावा तसा या भागातील शेतकऱ्यांना फायदा झालाच नाही.

lower dudhna dam
भोकर विधानसभा मतदारसंघावर भगवा झेंडा फडकिवण्याचा सेनेचा निर्धार

या धरणामुळे अधिकारी व ठेकेदार मालामाल, गब्बर झालेत. सेलूतील महत्त्वाचे लोअर दुधना प्रकल्प धरणाचे कार्यालय जालना येथे हालविण्यात आले. त्यास तत्कालीन लोकप्रतिनीधींनी साधा आक्षेपही नोंदविला नाही. धरणाच्या लाभ क्षेत्रात कार्यालय आवश्यक असताना कार्यालय का हलविण्यात आले हे न उलगडणारे कोडे आहे. सदरील कार्यालय सेलू येथेच असणे गरजेचे आहे. तसेच वेळोवेळी धरणातून पाणी सोडण्याबाबत निश्चित धोरण आखणे आवश्यक आहे. मात्र प्रशासन त्याबाबत ही गंभीर नाही. त्यातच काही दिवसांपासून धरणाच्या मुख्य भिंतीतून कांरज्या सारखे पाणी बाहेर येत असल्याने भविष्यात धरण फुटते की काय? अशी भीती नागरिकांतून व्यक्त होत आहे.

lower dudhna dam
औरंगाबादच्या २२ गावांतील ३० बालविवाह रोखले, तिला शिकू द्या ओ!

यंदाच्या पावसाळ्यात जुलै महिण्यातच धरण ८४ टक्के इतके भरले. लवकरच धरण शंभर टक्के इतके भरेल, परंतू धरण्याच्या मुख्य भींतीतून बाहेर येणारे पाणी घतकच ठरते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com