esakal | भोकर विधानसभा मतदारसंघावर भगवा झेंडा फडकिवण्याचा सेनेचा निर्धार
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान

भोकर विधानसभा मतदारसंघावर भगवा झेंडा फडकिवण्याचा सेनेचा निर्धार

sakal_logo
By
लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर (जि.नांदेड) : शिवसंपर्क अभियानाला (Shiv Sampark Abhiyan) जिल्ह्यात खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे. येणाऱ्या काळातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत व भोकर विधानसभा मतदारसंघावर (Bhokar Assembly Seat) भगवा झेंडा फडकिवण्याचा निर्धार करून  शिवसैनिकांनी कामाला लागावे. शिवसंपर्क अभियानाला मिळत असलेल्या प्रतिसादमुळे काँग्रेसचे नेते शिवसेनेच्या (Shiv Sena) पदाधिकाऱ्यांविषयी जनतेत भ्रम निर्माण करणारी वक्तव्य करित आहेत. राज्यात आघाडीचे सरकार आहे. या सरकारचे नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करित आहेत. नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी ठाकरे सरकारने निधी मंजूर केला आहे. तसेच अनेक जनहिताचे निर्णय घेतली आहेत. याची माहिती समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसैनिकांनी (Nanded) काम करावे, असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख आनंद पाटील बोंढारकर यांनी बारसगाव येथील सभेत केले. गणपूर येथील काही ग्रामपंचायत सदस्यांनी तालुकाप्रमुख संतोष कपाटे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. (shiv sena to be win bhokar assembly seat nanded news glp88)

हेही वाचा: 'आगामी देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीतही भाजपचा विजय'

खासदार कोणी निवडून आणले?

जिल्हा परिषद सदस्य बबनराव बारसे  हे शिवसैनिक आहेत. गेल्या वीस वर्षांपासून स्वबळावर निवडणूक जिंकले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत भोकर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या गावात खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना मताधिक्य मिळाले आहे. मग यांना कोणी मदत केली हे काँग्रेसच्या नेत्यांनी सांगावे. शिवसेनेत पक्ष प्रमुखांचा आदेश चालतो. काँग्रेसच्या आमदारांनी दुसऱ्यांच्या डोकावून उठाठेव करू नये, असा टोला बाळासाहेब देशमुखांनी लगावला.

हेही वाचा: माणुसकीची एैसीतैसी! मदत न करता कंटनेरमधील बिअरचे बाॅक्स पळविले

पालकमंत्र्यांनी विकास कामांचे श्रेय लाटू नये

राज्यात आघाडीचे सरकार असून राज्याच्या  सर्वांगीण विकासाची जबाबदारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर आहे. त्यांनी नांदेड जिल्ह्यातील विकास कामांसाठी खूप मोठा निधी दिला आहे. पालकमंत्री आपणच सर्व कामे केली आहेत, असे भासवत आहेत. कोणतेही कामे मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने होत आसतात. याचा विसर काँग्रेसच्या नेत्यांना पडत आहे. येळेगावच्या सभेत शेतकरी, कारखाना , ऊसाचा भाव याविषयी न बोलता शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांबाबत चुकीचे वक्तव्य केली आहेत. भोकर विधानसभा मतदारसंघात  काँग्रेसच्या नेत्यांना निवडणुकीत मतांसाठी लक्ष्मीदर्शन का करावे लागते, चार कारखान्याचे दोन कारखाने कसे झाले याचे उत्तर द्यावीत, असे आवाहन नागोराव इंगोले यांनी केले.

loading image
go to top