Osmanabad : निम्न तेरणा धरण भरले, १४ दरवाजे उघडले

माकणी (ता.लोहारा, जि.उस्मानाबाद)  येथील निम्न तेरणा धरण रविवारी पूर्ण क्षमतेने भरले आहे. यामुळे धरणाचे १४ दरवाजे  उघडण्यात आले आहे.  (छायाचित्र - सदाशिव जाधव, माकणी)
माकणी (ता.लोहारा, जि.उस्मानाबाद) येथील निम्न तेरणा धरण रविवारी पूर्ण क्षमतेने भरले आहे. यामुळे धरणाचे १४ दरवाजे उघडण्यात आले आहे.  (छायाचित्र - सदाशिव जाधव, माकणी)
Updated on

सदाशिव जाधव / सकाळ वृत्तसेवा

माकणी (जि.उस्मानाबाद) : माकणी (ता.लोहारा) (Lohara) येथील निम्न तेरणा धरणात (Lower Terna Dam) रविवारी (ता.२६) पहाटे पाचच्या सुमारास शंभर टक्के पाणीसाठा झाला. काही दिवसांपासून उस्मानाबाद (Osmanabad), लातूर (Latur) जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले येथील निम्न तेरणा धरण रविवारी पहाटे पुर्ण क्षमतेने भरले. त्यामुळे पहाटे पाच वाजता धरणाचे सहा चार दरवाजे उघडण्यात आले. १२१ दशलश घनमीटर साठवण क्षमता असलेला निम्न तेरणा प्रकल्प वर्ष १९८९-९० पासून अकरा वेळेस पूर्ण क्षमतेने भरला आहे. या वर्षी मध्यंतरी पावसाने (Rain) हुलकावणी दिल्याने हे धरण भरते की नाही या चिंतेत शेतकरी नागरिक होते. गेल्या काही दिवसांपासून उस्मानाबाद, तेर (Ter) परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे पाणी साठ्यात चांगली वाढ झाली. त्यामुळे प्रकल्पात पाण्याचा ओघ वाढला. यामुळे रविवारी हे धरण पूर्ण क्षमतेने (Marathwada) भरले. त्यामुळे पहाटे पाच वाजता धरणाचे चार दरवाजे १० सेंटिमिटरने उघडून पाणी नदी पात्रात सोडण्यात आले. त्यानंतरही पाण्याचा ओघ सुरुच असल्याने सकाळी आठ वाजता सर्व १४ दरवाजे उघडले.

तरी पाण्याचा ओघ अधिक असल्याने यातील चार दरवाजे २० सेंटिमीटरने उघडून १९५.२० क्युसेक्स पाण्याचा विर्सग करण्यात येत आहे. सद्यःस्थितीत पाण्याची आवक सुरूच असल्याची माहिती शाखाधिकारी के. आर. येणगे यांनी दिली. तहसीलदार संतोष रुईकर, प्रकल्पाचे शाखा अभियंता के.आर .येणगे, पोलिस निरीक्षक सुनिल काकडे, प्रकल्प कर्मचारी फतरु सय्यद, भालचंद्र जाधव, गौतम भोसले ,डी.एन.कदरे, पी.एम मंडोळकर, आर डी. रेड्डी , महसुल विभागाचे एस.एम.बिराजदार , भागवत गायकवाड, मंडळ अधिकारी शहाजी सांळुके, तलाठी वाजीद मिणियार, तलाठी कोकाटे, अमोल कोळी, विकास भोरे आदी अधिकारी व कर्मचारी पाणी पातळीवर लक्ष ठेवून आहेत.

रस्ते वाहतुकीसाठी बंद

याबाबत नदीकाठच्या गावांना तलाठी यांच्यामार्फत दंवडी देऊन सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदी पात्रातील पाणी माकणी -बेलकुंड, सास्तूर- गुबाळ रस्त्यावरील पुलावरुन जात आहे. खबरदारी म्हणून हे रस्ते वाहतुकीसाठी पहाटे पाचपासुन बंद करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Deputy Collector Eknath Bangale inspected seized illegal sand stock and reviewed security, distribution, and e-auction plans in Gangapur taluka
The Education Department appointed two teachers at Sayyadpur ZP School after villagers protested against the shortage of teaching staff.
Progressive farmer Govardhan Ugle received the Maharashtra Krushibhushan Award for outstanding achievements in organic farming.
Food Safety Department inspection alerts triggered shop closures amid concerns over gutkha sales and loose edible oil distribution.
Marathi News Esakal
www.esakal.com