गॅस दरवाढीविरुध्द अनोखं आंदोलन; नववधूच्या हातच्या भाकरी पंतप्रधान मोदींना पार्सल

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 29 December 2020

गॅस दरवाढीचा फटका सर्वांना बसताना दिसत आहे. देशात ठिकठिकाणी या दरवाढीविरुध्द आंदोलने होताना दिसतात.

उस्मानाबाद: गॅस दरवाढीचा फटका सर्वांना बसताना दिसत आहे. देशात ठिकठिकाणी या दरवाढीविरुध्द आंदोलने होताना दिसतात. पण उस्मानाबाद जिल्ह्यात गॅस दरवाढीविरुध्द एका अनोख्या प्रकारे आंदोलन केले आहे. हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्यावतीने 28 डिसेंबर रोजी राष्ट्रीय महामार्गावर केले आहे.

यामध्ये नववधूच्या हस्ते चूल पेटवून गॅस पेटवून गॅस सिलिंडर दरवाढीच्या निषेध नोंदविला आहे. एवढ्यावरच न थांबता चुलीवर भाजलेल्या भाकरी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पोस्टाद्वारे पाठवण्यात आल्या आहेत.

संदीप क्षीरसागरांना धक्का; समर्थक बाळासाहेब गुंजाळांचा शिवसेनेत प्रवेश

हे वेगळ्या प्रकारचं आंदोलन महिला कार्यकर्त्यांनी सोलापूर-धूळे (211) राष्ट्रीय महामार्गावर केलं. यामध्ये महामार्गावर नववधूच्या हस्ते चूल पेटवून त्यावर भाकरी भाजण्यात आल्या. केंद्राने तातडीने दरवाढ मागे घ्यावी नाहीतर राष्ट्रवादी जिल्हा महिला आघाडीच्यावतीने आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी दिला.

या आंदोलनात महिला आघाडीच्या जिल्हा कार्याध्यक्षा मनीषा पाटील, संगीता फाटक, अंजली जाधव, रोहन गव्हाणे, कृष्णा पाटील, सईद काझी आदी उपस्थित होते.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: LPG cylinder rate rise Movement pm modi