
हिंगोली : गायी-म्हशींत झपाट्याने पसरणाऱ्या लंपी आजाराची लक्षणे शहरात अनेक पशूंमध्ये तीव्रपणे दिसून येत असून, मोकाट जनावरांची संख्या पाहता लंपी झपाट्याने पसरण्याची शक्यता आहे. मात्र, अद्यापही या आजारावरील उपचार, प्रतिबंधासाठी यंत्रणेने कुठल्याही उपाययोजना सुरू केल्या नाहीत. नगरपालिका कोमात असून, या विभागालाच बूस्टर देण्याची वेळ आली आहे.