
धाराशिव : सध्याच्या वातावरणानुसार जनावरांना पुढील काळात लाळ-खुरकुत रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांसाठी तसा रेड अलर्ट राज्याच्या रोग नियंत्रण विभागाकडून दाखविण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण सुरू करण्यात आले असले तरी पुरेशा लस उपलब्ध नसल्याची स्थिती आहे.