esakal | हिंगोली जिल्हा परिषद महाआवास अभियानामध्ये विभागात तृतीय
sakal

बोलून बातमी शोधा

hingoli

हे पुरस्कार वितरण कार्यक्रम विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांच्या हस्ते शुक्रवारी (3 सप्टेंबर) रोजी होणार आहे

हिंगोली जिल्हा परिषद महाआवास अभियानामध्ये विभागात तृतीय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंगोली: केंद्र व राज्य पुरस्कृत आवास योजना ग्रामीण गतिमान करण्यासाठी तसेच गुणवत्ता वाढविण्यासाठी राज्यात महाआवास अभियान ग्रामीण राबविण्यात आले होते. यामध्ये हिंगोली जिल्हा परिषद विभागात तृतीय आली आहे. २० नोव्हेंबर २०२० ते ५ जुन २०२१ या कालावधीत राज्यात महाआवास अभियान ग्रामीण राबविण्यात आले होते. महाआवास अभियान-ग्रामीण अंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी व कामगिरीबाबत विभाग स्थरावर मूल्यमापन करून उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था व व्यक्तींचा महाआवास अभियान ग्रामीण पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. हे पुरस्कार वितरण कार्यक्रम विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांच्या हस्ते शुक्रवारी (3 सप्टेंबर) रोजी होणार आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत विभागात औरंगाबाद जिल्हा परिषद प्रथम, उस्मानाबाद जिल्हा परिषद द्वितीय आणि हिंगोली जिल्हा परिषद तृतीय पारितोषिक जाहीर झाले आहे. राज्य पुरस्कार योजनेत विभागात उस्मानाबाद जिल्हा परिषद प्रथम, औरंगाबाद जिल्हा परिषद द्वितीय आणि परभणी जिल्हा परिषद तृतीय पारितोषिक जाहीर झाले आहे. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरक्षित अंतर पाळून तसेच सर्व नियमांचे पालन करण्या संदर्भात विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: राष्ट्रवादीच्या आरोपानंतर खासदारांनी घेतली थेट उद्योगमंत्र्यांची भेट

उत्कृष्ठ कामगिरी केल्याने पुरस्कार प्राप्त जिल्ह्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, प्रकल्प संचालक निलेश कानवडे तसेच योजनेचे सनियंत्रण करणारे जिल्हा प्रोग्रामर गणेश पाटील यांना आयुक्त कार्यालयात पुरस्कार स्वीकार करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. दरम्यान, या निकषावर निवड- भूमिहीन लाभार्थी यांना जागा उपलब्ध करून देणे, मंजुरी देणे, प्रथम हप्ता वितरित करणे, भौतिकदृष्ट्या घरकुल पूर्ण करणे, आर्थिक दृष्ट्या घरकुल पूर्ण करणे, गवंडी प्रशिक्षण कार्यक्रमाचे यशस्वी अंमलबजावणी करणे, आवास प्लस अंतर्गत आधार तसेच जॉब कार्ड लिंक करणे, प्रलंबित घरकुले पूर्ण करणे, डेमो हाउस पूर्ण करणे, प्रतिक्षा यादीतील लाभार्थी यांची आधार लिंक करणे १० विविध योजनांशी कृतीसंगम आहेत.

loading image
go to top