राष्ट्रवादीच्या आरोपानंतर खासदारांनी घेतली थेट उद्योगमंत्र्यांची भेट

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी लागणार्‍या जागेचा प्रश्न निकाली निघणार आहे, अशी माहिती खासदार संजय जाधव यांनी दिली
parbhani
parbhaniparbhani
Updated on
Summary

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी लागणार्‍या जागेचा प्रश्न निकाली निघणार आहे, अशी माहिती खासदार संजय जाधव यांनी दिली

परभणी: येथील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी गंगाखेड रोडवरील जागा उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी परभणीचे खासदार संजय जाधव यांना सोमवारी (३० ऑगस्ट) रोजी मुंबईत दिले आहे. त्यामुळे आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी लागणार्‍या जागेचा प्रश्न निकाली निघणार आहे, अशी माहिती खासदार संजय जाधव यांनी दिली. परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे म्हणून खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली परभणीकरांचे आंदोलन सुरू आहे. शासनाने परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू केल्यास या महाविद्यालयासाठी जागा लागणार आहे.

दरम्यान, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाची ५० एकर जमीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास देण्यासाठीचा प्रस्ताव कृषी विद्यापीठाने यापूर्वीच घेतलेला असून त्यास मान्यतेसाठी वरिष्ठस्तरावर पाठविण्यात आलेले आहे. तसेच गंगाखेड रस्त्यावरील ब्राह्मणगाव शिवारातील मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाची १०० एकर जागाही उपलब्ध आहे. या दोन्हीपैकी कोणत्याही एका ठिकाणची जमीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी देण्यात यावी म्हणून खासदार संजय जाधव यांनी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची मुंबईत भेट घेतली होती. या भेटीत वरील दोन्ही जागेसंदर्भात उभयतांमध्ये सविस्तर चर्चा झाली असल्याची माहिती खासदार जाधव यांनी दिली.

parbhani
सावधान! येलदरी धरणाचे दरवाजे केंव्हाही उघडू शकतात, खडकपूर्णातून आवक वाढली

परभणीच्या प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी कोणतीही जागा उपलब्ध करून द्या, असा आग्रह खासदार जाधव यांनी उद्योगमंत्र्याकडे धरला. त्यावर सुभाष देसाई यांनी सांगितले की, गंगाखेड रस्तावरील मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाची ३ गटात १०० एकर जमीन आहे. त्यापैकी दोन गटाच्या जमिनीवर कर्ज घेतलेले आहे. हा कर्ज बोजा कमी करून बेबाकी व ना हरकत प्रमाणपत्र सादर केल्यास ही जमीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी देता येईल. ही पूर्ण प्रक्रिया पार पाडून जमीन उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी खासदार संजय जाधव यांना यावेळी दिले.

parbhani
'अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश'

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, डॉ. राम शिंदे उपस्थित होते. उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी लागणाऱ्या जागेचा तिढा आता जवळपास सुटला असून परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळविण्याच्या मार्गातील एक मोठा अडसर दूर होणार आहे, असेही खासदार संजय जाधव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com