esakal | हिंगोली झेडपीच्या शिक्षण सभापतीपदी महादेव एकलारेंची निवड
sakal

बोलून बातमी शोधा


हिंगोली : जिल्हा परिषद शिक्षण सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे महादेव एकलारे यांची निवड करण्यात आली. यावेळी आमदार राजु नवघरे, आमदार संतोष बांगर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनिष आखरे आदींची उपस्थिती होती.

हिंगोली झेडपीच्या शिक्षण सभापतीपदी महादेव एकलारेंची निवड

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : हिंगोली जिल्हा परिषदेच्या (Hingoli Zilla Parishad) शिक्षण सभापतीपदासाठी गुरुवारी (ता.२२) निवड प्रक्रिया घेण्यात आली. यात दोन उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यात आल्याने मतदान घेण्यात आले. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress Party) महादेव एकलारे विजयी झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या तत्कालीन सभापती रत्नमाला चव्हाण यांच्यावर सदस्यांनी अविश्वास ठराव आणला होता. विशेष म्हणजे त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभापती होत्या व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. तो मंजूर झाल्याने या रिक्त जागेसाठी गुरुवारी जिल्हा परिषदेच्या षटकोनी सभागृहात गुरुवारीदुपारी दोन वाजता पीठासीन अधिकारी अतुल चोरमारे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी शिक्षण सभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे महादेव संभाआआप्पा एकलारे व काँग्रेसचे (Congress Party) कैलास सोळंके या़चे अर्ज आल्याने मतदान घेण्यात आले.(mahadev eklahare appointed as hingoli zilla parishad's education committe chairman glp88)

हेही वाचा: PHOTOS: मराठवाड्यातील नद्यांना पूर; वाहतूक बंद, पिकांचे नुकसान

यात राष्ट्रवादी काँग्रेसचे महादेव एकलारे यांना २९, तर काँग्रेसचे कैलास सोळंके यांना २१ मते पडली. आज ५० सदस्य उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे एकुण ५२ सदस्य आहेत. त्यापैकी एक सदस्य तिसऱ्या अपत्य प्रकरणी अडकला, तर एक जात पडताळणीत अडकल्याने सदस्य संख्या ५० आहे. यामुळे पीठासीन अधिकारी अतुल चोरमारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे महादेव एकलारे यांना विजयी घोषित केले आहे. दरम्यान श्री.एकलारे हे वसमत तालुक्यातील बाभूळगाव गटातून निवडून आले असून आमदार राजु नवघरे यांचे समर्थक आहेत. त्यांच्या विजयानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार राजु नवघरे, आमदार संतोष बांगर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनिष आखरे आदींची उपस्थिती होती.

loading image