
परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येला दीड वर्षांहून अधिक काळ झाला तरी अद्याप मारेकरी मोकाटच आहेत. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी अधिवेशन काळात विष प्राशन करून आत्महत्येचाही प्रयत्न केला. दरम्यान, महादेव मुंडे हत्या प्रकरणी वाल्मिक कराडचा जुना सहकारी विजयसिंह बांगरने खळबळजनक असा दावा केलाय.