

Drought Management in Maharashtra Agriculture Commissioner Guides Farmers on Fodder Crops and Water Conservation in Gangapur
esakal
-रामेश्वर अमृते
गंगापूर: महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त सुरज मांढरे यांनी ता.२ सोमवार रोजी तालुक्याचा विशेष दुष्काळ पाहणी व शेती नियोजन दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन शेतकरी व महिला बचत गटातील महिलांशी संवाद साधत बचत गटाकडुन केल्या जाणाऱ्या शेतीची पाहणी केली. तसेच पाण्याचे काटेकोर नियोजन आणि चारा लागवडीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.