

Dattatray Bharne Promises Relief for Maharashtra’s Crop-Damaged Farmers
Esakal
नांदेड, ता. १९ ः मराठवाड्यासह राज्यात पावसाचे प्रमाण कमी आणि दीर्घ खंड पडल्याने पिकांवर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील. पीकविम्याचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी मुदतपूर्व पीक कापणी प्रयोग तातडीने, अचूक व पारदर्शकपणे पूर्ण करावेत, असे निर्देश कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना शनिवारी दिले.