
लातूर : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या लाभार्थ्यांनी राज्यात एक हजार मेगावॉट क्षमतेचा टप्पा ओलांडला आहे. लातूर परिमंडळातही या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच लातूर परिमंडळातील ११ हजार २६१ वीजग्राहक हे ‘उर्जानिर्माते’ बनले आहे. परिमंडळात लातूर जिल्हा आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.