

Farmers Question Agriculture Minister Dattatray Bharne in Hingoli
esakal
मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागांत पावसाने ओढ दिल्याने पिके करपण्याची वेळ आली आहे. दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या समस्या आणि पिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी नांदेडच्या जिल्हा नियोजन सभागृहात शनिवारी विशेष आढावा बैठक घेण्यात आली. मात्र, या बैठकीतील नेते आणि वरिष्ठ अधिकारी काजू-बदाम खात असल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे.