

Drought Review Meeting Sparks Debate
Esakal
नांदेडमध्ये कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत नेते आणि अधिकाऱ्यांसाठी ठेवण्यात आलेल्या ड्राय फ्रूट्सवरून आता विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. शेतकरी दुष्काळात होरपळत असताना नेते मात्र ड्राय फ्रूटवर ताव मारत असल्याचं विरोधकांनी म्हटलंय. खासदार बंडू जाधव यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावर खासदार बंडू जाधव यांनी प्रतिक्रिया देतानाही वादग्रस्त विधान केलंय. दुष्काळ आहे म्हणून कोणी खात नाहीय का? असा प्रश्न खासदार जाधव यांनी विचारलाय. पुढाऱ्यांनी ते आणा म्हटलं नव्हतं असंही खासदार म्हणाले.