
छत्रपती संभाजीनगर - महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत मराठवाड्यातील १८० कामगारांनी गंभीर आजारासाठी अर्ज दाखल केले. त्यांना ३९ लाख ६५ हजारांची मदत मिळाली, तर सहा हजार १३३ कामगारांच्या पाल्यांना एक कोटी ८९ लाख ६८ हजार २४२ रुपयांची शिष्यवृत्ती रक्कम देण्यात आली. यात सर्वसाधारण शिष्यवृत्तीसाठी पाच हजार २६९ जणांनी एवढे अर्ज केले.