

Maharashtra Election Results 2026 Dr Patil of Mahavikas Aghadi Defeats Satish Chavan as His Fourth Win Bid Falls Short
sakal
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत तब्बल १८ वर्षांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी दणदणीत विजय मिळविला. सलग तिसऱ्यांदा विजयी होत चौथ्यांदा रिंगणात उतरलेल्या सतीश चव्हाण यांचा डॉ. पाटील यांनी दारुण पराभव केला. मतमोजणी तब्बल ४० तासांहून अधिक वेळ चालली. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत निकालाची अधिकृत घोषणा झालेली नव्हती.