

Maharashtra Politics Sees Major Realignment as Shiv Sena (Shinde) Aligns with AIMIM in Parli
esakal
बीड जिल्ह्यातील परळी शहरातील नगरपरिषदेत अलीकडेच घडलेल्या एका घटनेने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. येथे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटाने आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने एमआयएमसोबत हातमिळवणी केली आहे. ही युती नगरपरिषदेच्या गटनेता निवडीसाठी झाली असून, यामुळे विरोधकांकडून तीव्र टीका होत आहे. विशेष म्हणजे, या गटात एमआयएमच्या सदस्याचा समावेश करण्यात आला आहे.