

"Guardian Minister Pankaja Munde Visits Flood-Hit Fields in Jalna District"
esakal
आनंद इंदानी
बदनापूर : बदनापूर तालुक्यात सातत्याने अतिवृष्टी होत असून त्यात खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. बदनापूर तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त मात्रेवाडी शिवारात जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी बुधवारी (ता. १७) सकाळी बाधित पिकांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीची व्यथा मांडली. यावेळी पालकमंत्री मुंडे यांनी अतिवृष्टीत झालेल्या पिकांच्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल मी स्वतः बघितला आहे. प्रमाणापेक्षा अधिक पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना निश्चित मदत देण्यात येईल, असे आश्वासन दिले.