
लातूर : महसुल कर्मचारी विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर
चाकूर: महाराष्ट्र राज्य महसुल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विविध प्रलंबीत मागण्यासाठी सोमवारी (ता.४) पासून बेमुदत संपाला सुरूवात केली आहे यामुळे तहसील कार्यालयातील कामकाज खोळंबले आहे. नायब तहसीलदार संवर्ग रद्द करावा, अव्वल कारकून मधून नायब तहसीलदार पदोन्नतीची प्रक्रीया तात्काळ पुर्ण करावी, महुसल सहाय्यकाची रिक्त पदे भरावीत, अस्थायी पदांना कायम करावे आदी १६ मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य महसुल कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध मार्गाने आंदोलन केले जात आहे.
२१ मार्च रोजी निदर्शने, २३ मार्च रोजीी काळ्या फिती लावून काम करणे व २८ मार्च रोजी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषन करण्यात आले आहे. यानंतर सोमवारी पासून कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाला सुरूवात केली आहे. याबाबतच्या मागण्याचे निवेदन तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले या संपात महसुल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी मुळे, सचिव महेश राठोड, गणेश विडेगोटी, आर. के. माने, नरसिंग आलुरे, रामदास रेड्डी, आनंद धनेश्वर, व्ही. आर. लंगोटे, एस. के. कासराळीकर, व्ही. डी. तोंडारे, एस.एस. शेख आदी सहभागी झाले आहेत. शनिवार व रविवारच्या सुट्टीनंतर सोमवारी कर्मचारी संपावर गेल्यामुळे तहसील कार्यालयातील कामकाज खोळंबले आहे, बाहेर गावाहून कामानिमीत्त आलेल्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला.
Web Title: Maharashtra State Revenue Staff Strike For Various Demands Latur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..