Sugarcane FRP 2026-27: कारखान्यांचे गाळप सुरू; ९० कोटींच्या थकबाकीचे काय? मराठवाड्यातील २० साखर कारखान्यांचा समावेश, ऊस उत्पादक प्रतीक्षेत

Maharashtra Sugarcane FRP and Pending Dues 2026-27 : राज्यातील ५२ साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे २३४.७८ कोटी रुपये थकीत; मराठवाड्यातील २० कारखान्यांकडे ९० कोटींची देणी प्रलंबित, यंदा एफआरपी प्रतिटन ३,६५० रुपये जाहीर.
Sugarcane farmers await pending payments as the 2026-27 crushing season gathers pace in Maharashtra.

Sugarcane farmers await pending payments as the 2026-27 crushing season gathers pace in Maharashtra.

esakal

Updated on: 

धाराशिव : राज्यातील ५२ साखर कारखान्यांकडे २३४ कोटी ७८ लाख रुपयांची शेतकऱ्यांची मागील देणी थकीत असून, त्यात मराठवाड्यातील २० कारखान्यांकडे ९० कोटी रुपयांची ‘येणे बाकी’ असल्याने वाढत्या साखर दरामुळे ते यंदा मिळतील, अशी ऊस उत्पादकांना अपेक्षा आहे.

दरम्यान, मराठवाड्यात २०२६-२७ च्या ऊस गाळप हंगामाला वेग आला असून, आतापर्यंत ५१ कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. केंद्र सरकारने यंदाच्या हंगामासाठी मूळ एफआरपीमध्ये प्रतिटन १०० रुपयांची वाढ करत ३,६५० रुपये प्रतिटन दर जाहीर केला आहे. मात्र, अद्यापही गेल्या हंगामातील ९० कोटी रुपये २० साखर कारखान्यांकडे शिल्लक आहेत.

Loading content, please wait...