केज (जि. बीड) : भाजपच्या नमिता मुंदडांचे राॅकेट सुसाट, मिळाले इतके मताधिक्य | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 October 2019

केज (जि. बीड) - अंतिम फेरीच्या मतमोजणीत भाजपच्या नमिता मुंदडा ३२,९८३ मताधिक्याने विजयी झाल्या. त्यांना एकूण १,२२,३८३ मते मिळाली. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पृथ्वीराज साठे ८९,४०० मते घेऊन दुसऱया स्थानी राहिले. 

केज (जि. बीड) - अंतिम फेरीच्या मतमोजणीत भाजपच्या नमिता मुंदडा ३२,९८३ मताधिक्याने विजयी झाल्या. त्यांना एकूण १,२२,३८३ मते मिळाली. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पृथ्वीराज साठे ८९,४०० मते घेऊन दुसऱया स्थानी राहिले. 

भाजपच्या मुंदडा यांनी साठे यांच्यावर सुरवातीपासून घेतलेली आघाडी कायम राहिली. राष्ट्रवादीचे साठे पहिल्या फेरीपासून मागे आहेत. या मतदारसंघ मागील बऱ्याच काळापासून पुरोगामी विचारांचा प्रभाव असणारा होता. मात्र, 1990 मध्ये झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत विमल मुंदडा यांनी भागूजी सातपुते यांचा पराभव करून पहिल्यांदाच
विजय मिळवला. त्यानंतर त्या एकवेळ भाजपकडून तर तीनवेळा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून चढत्या क्रमाने मताधिक्‍य मिळवून विजयी झाल्या.

आघाडी सरकारमध्ये त्यांनी राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले. आपल्या कार्यकाळात विकासाची कामे करीत त्यांनी 'ओन्ली विमल' अशी आपली मतदारसंघात वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या अकाली निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे तत्कालीन समर्थक पृथ्वीराज साठे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली. त्यांनी
या निवडणुकीत भाजपाच्या संगीता ठोंबरे यांचा पराभव केला.

त्यानंतर 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपच्या संगीता ठोंबरे यांनी विमल मुंदडा यांच्या स्नुषा यांचा मोदी लाटेत बेचाळीस हजार मतांनी पराभव केला. यावेळी मोदी लाटेतही नमिता मुंदडा यांनी बासष्ट हजारांच्या वर मतदान घेतले होते. कार्यकाळात पक्षात झालेल्या अंतर्गत मतभेदाला कंटाळून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून उमेदवारी जाहीर होऊनही मुंदडा कुटुंबीयांनी ती झुगारून पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करीत विधानसभेची उमेदवारी मिळवली.

या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पृथ्वीराज साठे यांच्याशी सामना करावा लागला. केज विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह एकूण बारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. पण, खरी लढत मुंदडा आणि साठे यांच्यातच झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election Kej final result BJP Namita Mundada won