लातूर ग्रामीण : देशमुखांनी गढी राखली | Election Results 2019

विकास गाढवे
Thursday, 24 October 2019

लातूर - लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ सलग तिसऱ्यांदा ताब्यात ठेवण्यात कॉंग्रेसला यश आले आहे. मतदारसंघातून दिवगंत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे धाकटे सुपूत्र धीरज देशमुख एक लाख 18 हजार 208 मतांनी विजयी झाले असून त्यांच्या विजयाची औपचारिक घोषणा अद्याप बाकी आहे.

अंतिम फेरीअखेर त्यांनी एक लाख 31 हजार 321 मते घेतली तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार सचिन देशमुख यांना 13 हजार 113 मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे मंचककराव डोणे 12 हजार 670 मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. मतदारसंघात सर्वाधिक 24 हजार 899 मते नोटाला मिळाली आहेत. हे येथे विशेष होय.

लातूर तालुक्यातील 96, संपूर्ण रेणापूर तालुक्यातील 76 तर औसा तालुक्यातील 46 गावांचा मिळून हा मतदार मतदारसंघ असून मतदारसंघाच्या स्थापनेपासून (2009) तो कॉंग्रेसच्या ताब्यात आहे. यंदाच्या निवडणुकीत शहर मतदारसंघातून विद्यमान आमदार अमित देशमुख व लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिल्याने सर्वांचे लक्ष लागले होते. यात शेवटच्या क्षणी लातूर ग्रामीण मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला. यामुळे भाजपचे वर्चस्व असलेल्या मतदारसंघात कॉंग्रेसचा विजयाचा मार्ग मोकळा झाला. त्यात शिवसेनेने अनोळखी असलेल्या सचिन देशमुख यांना मध्यरात्री उमेदवारी देऊन निवडणुकीतील हवाच काढून घेतली.

सचिन देशमुख यांनी काहीच प्रचार न केल्याने धीरज देशमुख यांना फार कष्ट न करता विजय मिळवता आला. उमेदवारी दाखल केल्यापासून त्यांना केवळ मताधिक्क्याची चिंता होती. लाखाच्या पुढे मते घेऊन विजय मिळवण्याचा संकल्प त्यांनी केला होता. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचा संकल्प तडीस नेत त्यांना एक लाख 18 हजार 208 मतांची आघाडी दिली.

एवढ्या मोठ्या मताधिक्क्याने निवडून येणारे ते एकमेव आमदार असावेत. एकुरगा (ता. लातूर) जिल्हा परिषद गटाचे सदस्य म्हणून अडीच वर्षापूर्वी त्यांनी पहिली निवडणूक लढवली व त्यात ते विजयी झाले. जिल्हा परिषदेत विरोधी पक्षाचे सदस्य म्हणून काम करताना सत्ताधारी भाजपला वेळोवेळी घाम फोडला. वडील विलासराव देशमुख यांच्या हातावर हात मारणारे म्हणून त्यांची ओळख मतदारसंघात आहे. त्यांच्या निवडीने लातूर ग्रामीणला दहा वर्षानंतर पहिल्यांदाच हक्काचा आमदार मिळाला आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election Latur Gramin final result Dheeraj Deshmukh won