बदनापूर-अंबड (जि. जालना) - नारायण कुचेंनी गढ राखला | Election Results 2019

आनंद इंदानी
Thursday, 24 October 2019

बदनापूर (जिल्हा जालना) - बदनापूर-अंबड विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार नारायण कुचे यांनी दुसऱ्यांदा बाजी मारली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे उमेदवार बबलू चौधरी यांचा 18 हजार 612 मतांनी पराभव केला. 

या मतदार संघात बबलू चौधरी सलग तिसऱ्यांदा पराभूत झाले आहेत. नारायण कुचे यांना 1 लाख 5 हजार 312 तर बबलू चौधरी यांना 86 हजार 700 मते पडली. तर वंचित बहुजन आघाडी व मनसेचे फॅक्टर निष्प्रभ ठरले. 
वंचित आघाडीचे उमेदवार राजन मगरे यांना 9 हजार 869 मते मिळाली. तर मनसेचे राजेंद्र भोसले यांना केवळ 1643 मते मिळाली. 

बदनापूर विधानसभा मतदार संघ भाजप - शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र राज्यात निवडणुकी दरम्यान निर्माण झालेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची लाट व बबलू चौधरी यांचा यापूर्वी दोनदा झालेल्या पराभवाची सहानुभूती त्यांना विजयाचा उंबरठा ओलांडण्यास सहाय्यभूत ठरेल.

असे वाटत असताना महायुतीचे उमेदवार नारायण कुचे प्रचारा दरम्यान विकासाच्या मुद्यावर जोर दिला होता. अखेर मतदारांनी भावनिक राजकारणाला नाकारत विकासाला मत देत नारायण कुचे यांना विजयी केले. दरम्यान, मतमोजणीत नारायण कुचे यांनी टपाली मतदानापासून आघाडी घेतली होती. ही आघाडी बबलू चौधरी अखेरपर्यंत तोडू शकले नाही. नारायण कुचे यांनी निर्णायक आघाडी घेताच भाजप - शिवसेना महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election Narayan kuche final result ncp Rohit Pawar won