औरंगाबाद : शिवसेना हॅट्ट्रिकच्या दिशेने | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 October 2019

औरंगाबाद  - औरंगाबाद पश्चिम विधानसभा क्षेत्रात अत्यंत चुरशीची लढत सुरू आहे. तिसऱया फेरीतही शिवसेनेचे संजय शिरसाट आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीमध्ये शिवसेनेचे संजय शिरसाठ यांना 3402 मते मिळाली. एमआयएमचे उमेदवार अरुण बोर्डे यांना 772 मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे संदीप शिरसाट यांना 406 मते मिळाली.

भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार राजू शिंदे यांना अवगी 107 मते मिळाली आहेत. दुसऱ्या फेरीमध्ये संजय शिरसाठ यांना 3402 मते मिळाली. अरुण बोर्डे यांना 1772 संदीप शिरसाट यांना 406 मते मिळाली ऑफिसर राजू शिंदे यांना 2160 मते मिळाली आहेत.

औरंगाबाद  - औरंगाबाद पश्चिम विधानसभा क्षेत्रात अत्यंत चुरशीची लढत सुरू आहे. तिसऱया फेरीतही शिवसेनेचे संजय शिरसाट आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीमध्ये शिवसेनेचे संजय शिरसाठ यांना 3402 मते मिळाली. एमआयएमचे उमेदवार अरुण बोर्डे यांना 772 मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे संदीप शिरसाट यांना 406 मते मिळाली.

भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार राजू शिंदे यांना अवगी 107 मते मिळाली आहेत. दुसऱ्या फेरीमध्ये संजय शिरसाठ यांना 3402 मते मिळाली. अरुण बोर्डे यांना 1772 संदीप शिरसाट यांना 406 मते मिळाली ऑफिसर राजू शिंदे यांना 2160 मते मिळाली आहेत.

औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात अत्यंत संथगतीने मतमोजणीला सुरवात झाली. सुरवातीला पोस्टलमध्ये एकत्र करण्यात आली. पोस्टल मतांची मोजणी अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाही. दरम्यान, दुसरीकडे प्रत्यक्ष फेरीला सुरवात करण्यात आली पहिली आणि दुसरी फेरी जाहीर करण्यात आली आहे.

पहिल्या दोन फेरीमध्ये शिवसेनेचे संजय शिरसाठ आघाडीवर आहेत, तर भाजपचे बंडखोर आमदार राजू शिंदे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. एमआयचे उमेदवार अरुण बोर्डे यांना दुसऱ्या फेरीमध्ये एकही मत मिळू शकलेले नाही. एकूण 14 टेबलवर मतमोजणी करण्यात येत असून पंचवीस फेऱया पूर्ण झाल्यानंतर निकाल जाहीर होणार आहे.  

तिसरी फेरी

  • संजय शिरसाट 13679 (शिवसेना)
  • अरुण बोर्डे 2071 (एमआयएम) 
  • संदीप सिरसाट 2488 (वंचित)
  • राजू शिंदे यांना 6240 (अपक्ष)

 
अशी आहे औरंगाबाद पश्‍चिम मतदारसंघाची पार्श्‍वभूमी 
2004 मध्ये शहरात दोनच मतदार संघ होते औरंगाबाद पूर्व आणि औरंगाबाद पश्‍चिम. पश्‍चिममध्ये कॉंग्रेस उमेदवाराला 1 लाख 54 हजार 56 मतांनी विजयी झाले होते तर शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल यांना 1 लाख 46 हजार 170 मते मिळाली होती ते दुसऱ्या क्रमांकावर होते. यावेळी 10 उमेदवार मैदानात होते त्यात तीन अपक्ष होते.

2009 च्या निवडणुकीत औरंगाबाद शहराच्या पूर्व आणि पश्‍चिम मतदार संघात मध्य विधानसभा मतदार संघाची भर पडली आणि 2009 मध्ये पश्‍चिम मतदार संघातुन शिवसेनेचे संजय शिरसाट पहिल्यांदा आमदार झाले होते. 2009 मध्ये एकूण 19 उमेदवार मैदानात होते त्यात पहिल्यांदा संजय शिरसाट विजयी झाले होते त्यांना 58 हजार 8 मते मिळाली होती तर दुसऱ्या क्रमांकावरचे दुसऱ्या क्रमांकावर कॉंग्रेसचे चंद्रभान पारखे होते त्यांना 43 हजार 797 मते मिळाली होती. तर तिसऱ्या क्रमांकावर भारिपचे अमित भुईगळ होते त्यांना 3 हजार 791 मते मिळाली होती. त्यावेळी तब्बल 11 अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या मैदानात होते.  2014 मध्ये या मतदार संघात 18 उमेदवार होते.

काॅंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, बसप, मनसे, आरपीआय ( के.) सह अन्य पक्षांचे उमेदवार होते तर 6 अपक्ष मैदानात होते. त्यात शिवसेनेचे संजय शिरसाट यांनी 61 हजार 282 मतांनी विजयी झाले होते तर त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी भाजपचे मधुकर सावंत यांना 54 हजार 355 मते मिळाली होती. वैध मतांची संख्या 1 लाख 84 हजार 679 इतकी होती तर नोटाचे प्रमाण 1 हजार 131 इतके होते . 1995 मध्ये शिवसेनेचे चंद्रकांत खैरे 1 लाख 26 हजार 700 मते मिळवून आमदार झाले होते. 1990 मध्ये पहिल्यांदा शिवसेनेचे चंद्रकांत खैरे पहिल्यांदा 88 हजार 964 मते घेउन विजयी झाले होते. 1985 मध्ये एस कॉंग्रेसचे अमानुल्ला मोतीवाला होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election result aurangaabaad West trends middle phase