राज्यात सर्वाधिक उमेदवार असलेला 'या' मतदारसंघातून भाजपची आघाडी । Election Results 2019

BJP
BJP

औरंगाबाद: औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदार संघात सर्वाधिक उमेदवार असल्याचा विक्रम आहे.1995 पासुन ते 2019 पर्यंत सर्वाधिक उमेदवार या मतदारसंघात आहे. यंदा 34 उमेदवार रिंगणात आहेत. त्यात 23 उमेदवार हे अपक्ष आहेत.

पूर्वी या मतदारसंघात फुलंब्रीचा भाग जोडलेला होता.2009 पासुन पूर्व मतदारसंघ हा फुलंब्री आणि पश्चिम मधून वेगळा झाला. स्वतंत्र मतदारसंघ तयार झाल्यानंतर नव्या मतदारा बरोबर उमेदवारांची संख्याही वाढली. आणि 2014 पासून या मतदारसंघात अपक्ष उमेदवार याचीही सांख्या झपाट्याने वाढली. 2014 ला सतरा उमेदवार अपक्ष होते. तर यावेळी 23 उमेदवार रिंगणात आहेत.

यंदाही 34 उमेदवार रिंगणात

वर्ष 1995  --------- 21 उमेदवार
1999  ------------- 8 उमेदवार
2004--------------- 12 उमेदवार
2009--------------- 28 उमेदवार
2014--------------- 30 उमेदवार
2019--------------- 35 उमेदवार

पहिल्या फेरीपासून राज्यमंत्री अतुल सावे हे पिछाडीवर आहेत.

यात एकूण 34  उमेदवारांपैकी 23 उमेदवार अपक्ष होते. आणि 23 मुस्लिम उमेदवार असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर मतविभाजन होईन असे वाटले होते. मात्र, प्रत्यक्षात निकाल वेगळाच लागत आहे. 

पहिल्या फेरीत कादरी यांना 7 हजार 996 तर अतुल सावे यांना 63, दुसऱ्या फेरीत 71 मते मिळाली. सुरवातीच्या आठ ते नऊ फेऱ्या या मुस्लिम बाहुल पट्ट्यातील आहेत. त्यामुळे या फेऱ्यांमध्ये समाजवादी पक्षाचे कलीम कुरेशी व अपक्ष युसूफ मुकाती त्यांना चांगली मतदान में असे वाटले होते. मात्र, सर्व मतदार हे एकटा एमआयएमच्या बाजूने गेल्याचे पाचव्या फेरीत पर्यंतचे चित्र आहे. 

अशी आहे पूर्व विधानसभा मतदासंघाची पार्श्‍वभूमी 

1995 पुर्व विधानसभा मतदारसंघ आणि फुलंब्री एकत्र होता. तेव्हा भाजपचे उमेदवार हरिभाऊ बागडे 49 हजार 496 मते घेऊन विजयी झाले होते. तर कॉंग्रेसच्या उमदेवार पार्वती सिरसाट या 31 हजार 698 मते घेऊन दुसऱ्या तर कैशवराव औताडे हे 27 हजार 131 मते घेत तिसऱ्या स्थानी होते. यावेळी एकुण 21 उमेदवार रिंगणात होते. 

1999 मध्ये भाजपने पुन्हा पुर्व मध्ये बाजी मारली होती. बागडे 65 हजार 596 मते घेऊन विजयी झाले होते. तर कॉंग्रेसतर्फे केशवराव औताडे 48 हजार 823 मते घेऊन दुसऱ्या स्थानी होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सुधाकर सोनवणे यांनी 17 हजार 783 मते घेतली होती. यावेळी आठ उमेदवार रिंगणात होते.  

2004 मध्ये सतत तीन वेळा विजयाची श्रृंखलेत असलेले हरिभाऊ बागडे यांना पराभव स्विकारावा लागला होता. त्यांना कॉंग्रेसचे डॉ. कल्याण काळे यांनी 97 हजार 278 मते घेतली होती. तर 88 हजार 968 मते घेऊन बागडे दुसऱ्या स्थानी होते. त्यावेळी बारा उमेदवार रिंगणात होते. यात अपक्ष उमेदवार मिर्झा नासेर बेग यांनी 4 हजार 592 तर श्रीराम पवार यांना 2 हजार 165 मते मिळाली होती. 2009 मध्ये पुर्व आणि फुलंब्री स्वतंत्र मतदारसंघ झाला.

यावेळी एकुण 28 उमेदवार रिंगणात होते. यात कॉंग्रेसच्या उमेदवारांने बाजी मारली. तर भाजपचे डॉ. भागवत कराड हे 32 हजार 965 मते घेऊन दुसऱ्या स्थानी होते. यात अपक्ष उमेदवार सुभाष झांबड यांनी 17 हजार276 तर मोहम्मंद जावेद महोम्मद इसाक यांनी 12 हजार 276 मते घेतली होती. 2014 पुर्व मतदारसंघात 30 उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार अतुल सावे हे 64 हजार 528 मते घेऊन विजयी झाले होते. तर एमआयएमचे उमेदवार डॉ गफ्फार कादरी हे 60 हजार 268 मते घेऊन दुसऱ्यास्थानी होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com