औरंगाबाद पूर्व : नवव्या फेरीनंतर चित्र बदलायला सुरवात | Election Results 2019

योगेश पायघन
Thursday, 24 October 2019

औरंगाबाद - पूर्व मतदार संघात आठवी फेरीपर्यंत 46876 ने पिछाडीवर असलेले महायुतीचे राज्यमंत्री अतुल सावेंनी अकराव्या फेरीअखेर नऊ हजारांनी मताधिक्य कापायला सुरवात केली. अकराव्या फेरीअखेर 35 हजार 849 मतांनी एमआयएमचे. डॉ गफ्फार कादरी  आघाडीवर आहेत. 

औरंगाबाद - पूर्व मतदार संघात आठवी फेरीपर्यंत 46876 ने पिछाडीवर असलेले महायुतीचे राज्यमंत्री अतुल सावेंनी अकराव्या फेरीअखेर नऊ हजारांनी मताधिक्य कापायला सुरवात केली. अकराव्या फेरीअखेर 35 हजार 849 मतांनी एमआयएमचे. डॉ गफ्फार कादरी  आघाडीवर आहेत. 

अकराव्या फेरीअखेर डॉ गफ्फार कादरी यांना 61 हजार 469 मते, अतुल सावे यांना 25 हजार 620 मते आहेत. या दोन उमेदवारांमध्येच ही लढत होत आहे.  राज्यमंत्री सावे यांना पहिल्या फेरीपासून पाचव्या फेरीपर्यंत केवळ 1 हजार 39 मध्ये मिळाली आहेत. समाजवादी पक्षाचे उमेदवार कलिम कुरेशी यांना पाचव्या फेरीला 2 हजार 895 मते मिळाले. सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीस प्रारंभ झाला.

सुरवातीस पोस्ट मतमोजणी झाली त्यानंतर पोस्टल मतमोजणी व पहिल्या फेरीचा निकाल एकत्र जाहीर करण्यात आला. पहिल्या फेरीपासून राज्यमंत्री अतुल सावे हे पिछाडीवर होते. एकूण 34 उमेदवारांपैकी 23 उमेदवार अपक्ष असून 23 मुस्लिम उमेदवार असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर मतविभाजन होईन असे वाटले होते. मात्र, प्रत्यक्षात निकाल वेगळाच लागत आहे. पहिल्या फेरीत कादरी यांना 7 हजार 996 तर अतुल सावे यांना 63, दुसऱ्या फेरीत 71 मते मिळाली.

सुरुवातीच्या आठ ते नऊ फेऱ्या या मुस्लिम बाहुल पट्ट्यातील आहेत. त्यामुळे या फेऱ्यांमध्ये समाजवादी पक्षाचे कलीम कुरेशी व अपक्ष युसूफ मुकाती त्यांना चांगली मतदान में असे वाटले होते.  मात्र सर्व मतदार हे एमआयएमच्या बाजूने गेल्याचे पाचव्या फेरीत पर्यंतचे चित्र कायम होते. सातव्या फेरीत सावे 43 हजार 808, आठव्या फेरीत 46 हजार 876 पिछाडीवर होते. तर नवव्या फेरीत ही लीड तुटून  45 हजार 474 ने डॉ कादरी पुढे आहेत.  दरम्यान, पोलीस आयुक्तांनी मतदान केंद्रावर भेट दिली. त्यावेळी खेळाडू वृत्तीने मतदानाचा कौल स्वीकारण्याचे त्यांनी आवाहन केले.
 
अशी आहे पूर्व विधानसभा मतदासंघाची पार्श्‍वभूमी 
1995 पुर्व विधानसभा मतदारसंघ आणि फुलंब्री एकत्र होता. तेव्हा भाजपचे उमेदवार हरिभाऊ बागडे 49 हजार 496 मते घेऊन विजयी झाले होते. तर कॉंग्रेसच्या उमदेवार पार्वती सिरसाट या 31 हजार 698 मते घेऊन दुसऱ्या तर कैशवराव औताडे हे 27 हजार 131 मते घेत तिसऱ्या स्थानी होते. यावेळी एकुण 21 उमेदवार रिंगणात होते. 

1999 मध्ये भाजपने पुन्हा पुर्व मध्ये बाजी मारली होती. बागडे 65 हजार 596 मते घेऊन विजयी झाले होते. तर कॉंग्रेसतर्फे केशवराव औताडे 48 हजार 823 मते घेऊन दुसऱ्या स्थानी होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सुधाकर सोनवणे यांनी 17 हजार 783 मते घेतली होती. यावेळी आठ उमेदवार रिंगणात होते.

 2004 मध्ये सतत तीन वेळा विजयाची श्रृंखलेत असलेले हरिभाऊ बागडे यांना पराभव स्विकारावा लागला होता. त्यांना कॉंग्रेसचे डॉ. कल्याण काळे यांनी 97 हजार 278 मते घेतली होती. तर 88 हजार 968 मते घेऊन बागडे दुसऱ्या स्थानी होते. त्यावेळी बारा उमेदवार रिंगणात होते. यात अपक्ष उमेदवार मिर्झा नासेर बेग यांनी 4 हजार 592 तर श्रीराम पवार यांना 2 हजार 165 मते मिळाली होती. 2009 मध्ये पुर्व आणि फुलंब्री स्वतंत्र मतदारसंघ झाला. यावेळी एकुण 28 उमेदवार रिंगणात होते. यात कॉंग्रेसच्या उमेदवारांने बाजी मारली. तर भाजपचे डॉ. भागवत कराड हे 32 हजार 965 मते घेऊन दुसऱ्या स्थानी होते.

यात अपक्ष उमेदवार सुभाष झांबड यांनी 17 हजार276 तर मोहम्मंद जावेद महोम्मद इसाक यांनी 12 हजार 276 मते घेतली होती. 2014 पुर्व मतदारसंघात 30 उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार अतुल सावे हे 64 हजार 528 मते घेऊन विजयी झाले होते. तर एमआयएमचे उमेदवार डॉ गफ्फार कादरी हे 60 हजार 268 मते घेऊन दुसऱ्यास्थानी होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election result Aurangabad poorv trends afternoon