बीड : काका-पुतण्याची तुंबळ लढाई; 'हे' आहेत 1102 मतांनी आघाडीवर । Election Results

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

बीड मतदार संघात सुरू असलेल्या काका - पुतण्याच्या  चुरशीच्या लढाईत मतमोजणीही ठासून टक्कर सुरु आहे. सातव्या फेरी अखेर जयदत्त क्षीरसागर ११०२ मतांनी आघाडीवर आहेत. 

बीड : बीड मतदार संघात सुरू असलेल्या काका - पुतण्याच्या  चुरशीच्या लढाईत मतमोजणीही ठासून टक्कर सुरु आहे. सातव्या फेरी अखेर जयदत्त क्षीरसागर ११०२ मतांनी आघाडीवर आहेत. 

शिवसेनेचे जयदत्त क्षीरसागर व राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर यांच्यात ही लढत होत आहे. पहिल्या फेरीपासून दोघांमध्ये घासून लढत सुरु आहे. पाचव्या फेरीअखेर संदीप यांनी ५४४ मतांची आघाडी मिळविली आहे. तिसऱ्या फेरीत जयदत्त क्षीरसागर एक हजार मतांनी आघाडीवर होते. आता सातव्या फेरीत काकांनी पुन्हा वर सरकत आघाडी घेतली आहे. 

युतीत शिवसेनेचा एकमेव मतदार संघ असलेल्या बीडमधून शिवसेनेकडून प्रा. सुरेश नवले दोन वेळा तर प्रा. सुनिल धांडे एकदा विजयी झाले. मागचे दोन वेळा जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर बीडमधून विजयी झाले.

दरम्यान, राष्ट्रवादीसोडून शिवसेनेत प्रवेश करुन मंत्रीपद मिळविलेले जयदत्त क्षीरसागर याच पक्षाचे उमेदवार आहेत. त्यांचा सामना राष्ट्रवादीचे उमेदवार आणि त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांच्या सोबत आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election result Beed trends Seventh phase