घनसांवगी (जि. जालना) : मतदारसंघात राष्ट्रवादीसाठी अटीतटी | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 October 2019

औरंगाबाद- घनसावंगी विधानसभा मतदारसंघात सुरु असलेल्या अत्यंत चुरशीच्या लढतीच्या दहाव्या फेरी अखेर शिवसेनेचे डाॅ. हिकमत उढाण यांनी 6 हजार 90 मतांची आघाडी घेतली आहे. चुरशीच्या होत असलेल्या या लढतीत शिवसेनेच्या हिकमत उढाण यांना दहाव्या फेरी अखेर 46 हजार 129 मते तर राष्ट्रवादी काॅग्रेसचे राजेश टोपे यांना 40 हजार 39 मते मिळाली आहे.

औरंगाबाद- घनसावंगी विधानसभा मतदारसंघात सुरु असलेल्या अत्यंत चुरशीच्या लढतीच्या दहाव्या फेरी अखेर शिवसेनेचे डाॅ. हिकमत उढाण यांनी 6 हजार 90 मतांची आघाडी घेतली आहे. चुरशीच्या होत असलेल्या या लढतीत शिवसेनेच्या हिकमत उढाण यांना दहाव्या फेरी अखेर 46 हजार 129 मते तर राष्ट्रवादी काॅग्रेसचे राजेश टोपे यांना 40 हजार 39 मते मिळाली आहे.

घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व राष्टवादी कॉग्रेसचे आमदार राजेश टोपे हे सलग वीस वर्षापासून प्रतिनिधीत्व करीत आहे. या काळात सलग पंधरा वर्ष उच्च व तंत्र शिक्षण खात्याचे कॅबीनेट मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे डॉ. हिकमत उढाण हे मागील विधानसभा निवडणूकीच्या पराभवानंतर या भागात राहून त्यांनी शिवसेना कार्यकर्त्याना त्यांचे हक्काचे सपंर्क कार्यालयाबरोबर त्यांनी मतदारसंघातील सर्वच सहकारी व स्थानीक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत शिवसेनेच्या कार्यकर्त्याना पाठबळ देवून चांगली मोर्चबांधणी केली. वैयक्तीक मतदारांशी चांगला संपर्क केला आहे.

राज्यातील सद्यपरिस्थतीत युती व आघाडीच्या शक्‍यता पाहता कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसची आघाडीत राजेश टोपे यांना निवडणूकीसाठी उमेदवारी देण्यात आली होती. तर दुसरीकडे युतीची शक्‍यता पाहता पूर्वी युतीत शिवसेनेकडे हा मतदारसंघ असल्याने शिवसेनेचे डॉ. हिकमत उढाण यांना उमेदवारी दिली होती.

त्यानुसार दोन्ही उमेदवारांकडून मागील महिन्यापासून रात्र दिवस एक करून गावोगावी मतदारांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. त्यात गावोगावी शिवसेना, राष्ट्रवादीचे प्रवेशांचे सोहळे रंगले. ग्रामीण भागात स्थानीक पुढाऱ्यात आपआपसातील मतभेद पाहता अनेक जण दोन्ही पक्षांत प्रवेश केले आहेत. त्यासाठी त्यांना प्रोत्साहीत करून आपल्याच पक्षात घेण्यासाठी दोन्ही नेत्याकडून प्रयत्न करण्यात आले.

राष्ट्रवादी कडून मतदारसंघात शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून खासदार अमोल कोल्हे, जयंत पाटील, रूपाली चाकणकर यांनी जाहीर सभा घेतल्या. त्याचबरोबर मातंग समाजांचा आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा मुहूर्त साधत ऍड मिलींद आव्हाड, सुषमा अंधारे यांचे कार्यक्रम घेण्यात आले. वारकरी समाजांचा मेळावा , बंजारा समाजाचा मेळावा घेऊन मोर्चबांधणी करण्यात आली तर शिवसेनेकडून अदित्य ठाकरे यांची जनआर्शीवाद यात्रेतून उपस्थित जनसमुदायांच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करण्यात आले.

 नुकतेच सिल्लोड येथील आमदार अब्दूल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्याबद्दल त्यांचा घनसावंगी येथे सत्कार कार्यक्रम, नितीन बानगुडे यांचे व्याख्यान तर बंजारा समाजाचा मेळावा यातून मोर्चबांधणी करण्यात आली आहे. एकंदरीत आमदार राजेश टोपे व शिवसेनेचे डॉ. हिकमत उढाण यांनी संपूर्ण मतदारसंघ निवडणूकीच्या आंचारसंहितेपूर्वीच मतदारसंघ पिंजून काढला होता.

वैयक्तीक मतदारांशी संपर्क साधून त्यांच्या भावना जाणून घेण्यात आल्या. त्याचबरोबर गावोगावी पक्षप्रवेशांचे सोहळा व जातीनिहाय समाजाचे मेळाव्यांची सर्वत्र चर्चा सुरु होती. सध्या तरी दहाव्या फेरी अखेर घनसावंगी विधानसभा मतदार संघातून डाॅ. उढाण यांनी आघाडी घेतली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election result Ghansawangi trends afternoon