esakal | कन्नड (जि. औरंगाबाद) : दानवेंच्या जावयाचा करिष्मा गुल? । Election Results 2019
sakal

बोलून बातमी शोधा

Harshavardhan Jadhav

कन्नड मतदारसंघात शिवसेनेचे उदयसिंग राजपूत 13 हजार मतांनी आघाडीवर

कन्नड (जि. औरंगाबाद) : दानवेंच्या जावयाचा करिष्मा गुल? । Election Results 2019

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या कन्नड-सोयगांव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उदयसिंग राजपूत 13 हजार मतांनी आघाडीवर आहेत.

शिवसेनेचे माजी आमदार व अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्याशी त्यांची थेट लढत होती. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि शिवसैनिकांवर खालच्या पातळीवर जाऊन जाधव यांनी प्रचारा दरम्यान टिका केली होती, त्याचा मोठा फटका त्यांना बसतांना दिसतो आहे. 

हर्षवर्धन जाधव यांचं बघा काय होतंय?

18 व्या फेरीअखेर शिवसेनेचे उदयसिंग राजपूत यांना 56798 तर हर्षवर्धन जाधव यांना 44081 मते मिळाली. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संतोष कोल्हे 32918 मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर आहेत. लोकसभा निवडणुकीत बंडखोरी करत हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेच्या विरोधात निवडणूक लढवली होती. 2 लाख 83 हजार मते मिळवत त्यांनी मोठ्या प्रमाणात मतविभाजन केले होते. त्याचा थेट परिणाम शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्यावर झाला होता. 

शेजारीच सिल्लोडमध्ये चाललंय काय?

परिणामी वीस वर्षानंतर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा पराभव होऊन एमआयएमचे इम्तियाज जलील निवडूण आले होते. जाधव हेच शिवसेनेच्या पराभवाला कारणीभूत असल्यामुळे जाधव यांना पराभूत करण्याचा शिवसैनिकांनी निर्धार केला होता. अशातच हर्षवर्धन जाधव यांनी केलेले शिवसेना विरोधी विधानाचा फटाक त्यांना मोठ्या प्रमाणात बसतांना दिसतो आहे.