लातूर : मतमोजणी केंद्राबाहेर रंगला 'आकड्यांचा खेळ' | Election Result 2019

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 October 2019

लातूर : शहर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू होऊन दोन तास उलटत आहेत. प्रत्येक फेरीचा निकाल ध्वनिक्षेपकावरुन सांगितला जात आहे. तस तसा आकड्यांचा खेळ मतमोजणी केंद्राबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांमध्ये, समर्थकांमध्ये रंगू लागला आहे. आपलीच सीट जिंकणार, असा विश्वासही ते व्यक्त करत आहेत तर काहींची धाकधूकही वाढली आहे.

लातूरची जागा कोण जिंकणार, यावर गेल्या दोन दिवसांपासून उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्यामुळे मतमोजणी केंद्राबाहेर काँग्रेस, भाजप आणि बहुजन वंचित आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमले आहेत. निकालाच्या प्रत्येक फेरीची माहिती मतमोजणी केंद्रातून ध्वनिवर्धकावरून सांगितली जात आहे. ही आकडेवारी मतमोजणी केंद्राबाहेर जमलेले कार्यकर्ते कागदावर टिपून घेत आहेत.

पुढच्या फेरीत आपण आणखी कसे पुढे राहू, असा पहिल्या फेरीअखेर काँग्रेसचे उमेदवार अमित देशमुख यांना ७,९१७ तर भाजपचे उमेदवार शैलेश लाहोटी यांना २,७८७ मते मिळाली आहेत. तर दुसऱ्या फेरीअखेर अमित देशमुख यांना 11,235 आणि शैलेश लाहोटी 6,163 मते मिळाली. निकाल समजताच काही कार्यकर्त्यामध्ये उत्सुकता तर काही कार्यकर्त्यांमध्ये धाकधुक वाढल्याचे दिसून आले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election result latur : trends Second Phase