
राजेश पवारांचा वसंतरावांना दे दणका
नायगाव मतदारसंघात राजेश पवारांना ४६ हजार ७२७ मतांची आघाडी
नांदेड - नायगाव विधानसभा मतदार संघात आतापर्यंत मतमोजणीच्या सतरा फेऱ्या पूर्ण झाल्या असून सतरा फेरी अखेर राजेश पवार हे ४६ हजार ७२७ मतांची आघाडी घेत विजयाच्या उबंरवठ्यावर आहेत.
पहिल्या फेरी पासून भाजपा मित्र पक्षाचे उमेदवार राजेश पवार आघाडीवर आहेत. आता पर्यंत सतरा फेऱ्यात एक लाख ४७ हजार दोनशे चार मतांची मोजणी झाली आहे. या फेरी अखेर काॅँग्रेसचे उमेदवार आमदार वसंतराव चव्हाण यांना 38 हजार 622 मते मिळाली. राजेश पवार यांना ८५ हजार ३४९ मते मिळाली आहेत. वंचित विकास आघाडीचे मारोतराव कवळे गुरूजी यांना १९ हजार १३ मते मिळाली आहेत.
राजेश पवार हे ४६ हजार ७२७ मताने आघाडीवर आहेत. राजेश पवार सातत्याने आघाडीवर असल्याचे पाहून कार्यकर्ते उत्साही दिसत आहेत. दरम्यान, सुरक्षेचा उपाय म्हणून आज गुरूवारी (ता. २४) रोजीचा आठवडी बाजार पूर्वसूचना न देताच आड तातडीने रद्द करावा लागला. मात्र पूर्व सूचना न दिल्याने व्यापारी व नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. नांदेड जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री कॉग्रेसचे अशोक चव्हाण भोकरमधून ५२ हजार मतांनी आघाडीवर आहेत.
किनवट मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्रदीप नाईक अडीच हजार मतांनी आघाडीवर, भाजपचे डॉ. तुषार राठोड ११ हजार मतांनी आघाडीवर, कॉँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर (देगलूर) दहा हजार मतांनी आघाडीवर. नांदेड दक्षिणमध्ये कॉग्रेसचे मोहन हंबर्डे तीन हजार मतांनी आघाडीवर तर नांदेड उत्तरमध्ये शिवसेनेचे बालाजी कल्याणकर नऊ हजार मतांनी आघाडीवर आहेत. लोहा मतदारसंघात शेकापचे श्यामसुंदर शिंदे ३५ हजार मतांनी आघाडीवर आघाडीवर आहेत. हदगाव मतदारसंघात शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर १० हजार मतांनी आघाडीवर आहेत.