Maratha Kranti Morcha : मराठा आरक्षणासाठी चापोलीत कडकडीत बंद

रविंद्र भताने 
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

चापोली (लातूर) - मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी (ता. नऊ) चापोलीत कडकडीत बंद पाळण्यात आला. परिसरातील गावातील मराठा युवक मोठ्या संख्येने चापोलीत सकाळी दहा वाजल्यापासून जमले होते.

चापोली (लातूर) - मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी (ता. नऊ) चापोलीत कडकडीत बंद पाळण्यात आला. परिसरातील गावातील मराठा युवक मोठ्या संख्येने चापोलीत सकाळी दहा वाजल्यापासून जमले होते.

गुरुवारी (ता. नऊ) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्याचे पडसाद चापोलीत सकाळ पासूनच दिसू लागले होते. बहुतांश व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सकाळी उघडलीच नाहीत. सकाळच्या वेळेला हॉटेल, दुकानावर होणारी गर्दी तसेच शाळेसाठी सुरू राहणारी लगबग आजच्या बंद मुळे पहावयास मिळाली नाही. सकाळ पासूनच रस्ते सुन्न पडली होती. सर्वत्र फक्त बंदचीच चर्चा रंगत होती. सकाळी दहा वाजता हिंपळनेर, नायगाव, अजनसोंडा, उमरगा (कोर्ट) व स्थानिकांनी गावातील जे दुकाने सुरू होती ती बंद करण्यासाठी मोर्चा काढला. शाळा महाविद्यालय ही बंद करण्यात आली होती. कडकडीत बंद केल्यानंतर आंदोलनकर्ते चाकूरला रवाना झाले. बंद दरम्यान काही हिंसक घटना घडू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.

टायर जाळू दिले नाही
परिसरातील गावातील आंदोलनकर्ते आल्यानंतर त्यातील काहींनी महामार्गावर तीन टायर टाकून त्याला आग लावली होती. पोलिस निरीक्षक रामेश्वर तट यांनी टायर पेट घेण्या अगोदरच ते महामार्गावरून काढण्यासाठी पोलिसांना सूचना केल्या व त्याला आंदोलनकांनी ही सहकार्य केले.

सोशल मिडियावर आवाहन
गुरुवारी (ता. नऊ) मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी महाराष्ट्र बंदची घोषणा देण्यात आली होती. व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर सारख्या सोशल मिडियावर महाराष्ट्र बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन गेल्या काही दिवसांपासून करण्यात येत होते. सोशल मिडियावर सातत्याने आरक्षणा संदर्भात पोस्ट फिरत आहेत. इतर पोस्ट पेक्षा आंदोलनाच्या पोस्ट जास्त शेअर केल्या जात आहेत. क्षणाक्षणाला आंदोलनातीला क्षणचित्रे आंदोलक सोशल मिडियावर शेअर करीत आहेत.

संबंधित बातम्या :
Maratha Kranti Morcha मराठवाड्यात कडकडीत बंद 
Maratha Kranti Morcha पुण्यात 'आयटीयन्स'ला पर्याय 'वर्क फ्रॉम होम'चा
Maratha Kranti Morcha डोंबिवलीत ठिय्या आंदोलनाला सुरवात
Maratha Kranti Morcha जुन्नरला सकाळपासूनच कडकडीत बंद
Maratha Kranti Morcha: नांदेड जिल्ह्यात शांततेत बंद; पोलिस अधीक्षक रस्त्यावर
Maratha Kranti Morcha 'कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही'
Maratha Kranti Morcha : नागठाणे येथे 'महाराष्ट्र बंद'ला मोठा पाठिंबा
Maratha Kranti Morcha : भोकरदनमध्ये रास्ता रोकोसह बाजारपेठ बंद
Maratha Kranti Morcha परभणी-गंगाखेड रस्त्यावर दगडफेक; बसचालक गंभीर
Maratha Kranti Morcha अमरावतीत कडकडीत बंद
Maratha Kranti Morcha : हिंगोलीत मोठा प्रतिसाद
Maratha Kranti Morcha जालन्यात चक्काजाम; जालना शहर बंद
Maratha Kranti Morcha: जालना: राजुर-फूलंब्री मार्गवार चक्का जाम
Maratha Kranti Morcha पिरंगुटमध्ये मोठा प्रतिसाद
Maratha Kranti Morcha: औरंगाबाद-जळगाव रस्त्यावर बस पेटवली
Maratha Kranti Morcha औरंगाबाद बाजार समितीवर मराठा आंदोलनाचा परिणाम

Web Title: #MaharashtraBand Maratha Kranti Morcha Chapoli is closed for the Maratha reservation