Maratha Kranti Morcha घाटी दक्ष: रुग्णसेवा सुरळीत, बंदमुळे रुग्णसंख्या मंदावली

योगेश पायघन
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) परिचारिका व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा तिसऱ्या दिवशीही संप सुरूच आहे. तर महाराष्ट्र बंद मुळे बाह्यरुग्ण विभागात दिसणारी दररोजची गर्दी ओसरल्याचे चित्र आहे. तर आंतर रुग्णसेवा नर्सिंगचे विद्यार्थी व कंत्राटी कर्मचारी यांच्या मदतीने सुरळीत करण्याचा प्रयत्न घाटी रुग्णालय प्रशासन करत आहे. तर सकाळ पासून रुग्णसंख्या मंदावली आहे.

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) परिचारिका व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा तिसऱ्या दिवशीही संप सुरूच आहे. तर महाराष्ट्र बंद मुळे बाह्यरुग्ण विभागात दिसणारी दररोजची गर्दी ओसरल्याचे चित्र आहे. तर आंतर रुग्णसेवा नर्सिंगचे विद्यार्थी व कंत्राटी कर्मचारी यांच्या मदतीने सुरळीत करण्याचा प्रयत्न घाटी रुग्णालय प्रशासन करत आहे. तर सकाळ पासून रुग्णसंख्या मंदावली आहे.

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून संपात सहभागी परिचारिका घाटी रुग्णालयात सकाळी सात वाजेपासून जमायला सुरुवात झाली. सात वाजता संगटनेच्या बैठकीत इमर्जन्सीसाठी परिचारिका रुग्णालय परिसरात हजर राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले. परिचारिका संघटनेच्या नेत्या इंदुमती थोरात आणि सुमंगल भक्त यांनी परिचरिकांना सूचना दिल्या. आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत संपात सहभागी राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच परिचारिका संघटनेने मराठा आरक्षण आंदोलनाला गेट मिटिंगमध्ये पाठिंबा जाहीर केला. तर कर्मचाऱ्यांनीही आपत्कालीन परिस्थिती मदतीसाठी तयार असल्याची ग्वाही अधिष्ठाता डॉ कानन येळीकर यांना दिली.

घाटी रुग्णालयात कास्ट्राईब कर्मचारी संघटनेने आधीच संपात सहभागी नसल्याचे लेखी पत्र दिले होते. त्यामुळे संप काळात नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मदत म्हणून पहिल्या शिफ्टला जाणाऱ्या व रात्रीची शिफ्ट करून परतणाऱ्या 200 विद्यार्थ्यांना नाष्ट्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली. तसेच जिल्हा रुग्णालयाच्या 25 परिचारिका घाटीत रुजू झाल्या असून खाजगी महाविद्यालयाच्या परिचारिकाही मदत करत आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णालय सज्ज असल्याचे अधिष्ठाता डॉ कानन येळीकर म्हणाल्या. सर्व डॉक्टर त्यांच्या विभागात हजर झाले असून सर्व निवासीही त्यांच्या मदतीला असल्याचे वैद्यकिय अधीक्षक डॉ भारत सोनवणे यांनी सांगितले. प्राचार्य प्रमोद पिंपळकर, उपअधिष्ठाता डॉ शिवाजी सुक्रे, उप अधीक्षक डॉ सय्यद अश्फाक, डॉ गजानन सुरवाडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ अनिल पुंगळे, डॉ विकास राठोड, डॉ प्रवीण लहाने, डॉ सरफराज, डॉ ज्ञानेश्वर, उपप्राचार्य रमेश शिंदे, मेट्रेन छाया चामले, केदारे आदी रुग्णसेवा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #MaharashtraBandh Maratha Kranti Morcha ghati: Due to the delay in patient services, patient services slow down