महाविकास आघाडीकडून सरकारच्या पेट्रोल- डिझेल, गॅस दरवाढीच्या विरोधात आंदोलन

राम काळगे 
Saturday, 6 February 2021

केंद्र सरकारच्या विरोधात दिल्लीतील किसान आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी चक्का जाम आंदोलन केले

निलंगा (लातूर): येथे केंद्र सरकारच्या विरोधात दिल्लीतील किसान आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी चक्का जाम आंदोलन केले. तसेच केंद्र सरकारच्या पेट्रोल-डिझेल गॅस दरवाढीच्या विरोधातही शिवाजी चौक निलंगा येथे महाविकास आघाडीच्यावतीने शनिवारी ता. सहा रोजी आंदोलन करण्यात आले.

येथील शिवाजी चौकात दुपारी बारा वाजता चक्काजाम आंदोलनाला सुरवात झाली. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या प्रमुख  पदाधिकाऱ्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं. त्यात काँग्रेसचे अशोकराव पाटील निलंगेकर, अभय साळुंखे, शिवसेनेचे तालुका प्रमुख अविनाश रेशमे, दयानंद चोपने, राष्ट्रवादीचे दिलीप पाटील, इस्माईल लदाफ, शेकापचे सोमवंशी, रिपाईचे विलास सुर्यवंशी यांसह आदीनी केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली.

कृषि कायद्यांविरोधात जाफराबाद येथे चक्का जाम आंदोलन

डिझेल, गॅस व पेट्रोल दरवाढीचा निषेध करीत गाड्या ढकलत उपविभागीय कार्यालयापर्यंत नेल्या. याप्रकारे आंदोलन करून विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनात काँग्रेसचे तालुकाप्रमुख विजयकुमार पाटील, गोविंद शिंगाडे, लाला पटेल, अजगर अन्सारी, महेश देशमुख, शिराज  देशमुख, अमित नितनवरे, विलास माने, उल्हास सूर्यवंशी, धम्मानंद  काळे, महेश चव्हाण, पंडितअण्णा धुमाळ, हसन चाऊस, ओम शिंदे, हरिभजन पौळ, ईश्वर पाटील, सुनील नाईकवाडे, अण्णासाहेब मिरगाळे, प्रशांत वाजरवाडे, नागनाथ बाबळसुरे, श्रीहरी मुगळे, धनराज मुळे, यशवंत बसपुरे, सतीश फटे, बालाजी माने, उमेश सातपुते, प्रसाद मठपती, रवी नागरसोगे  इत्यादींनी सक्रिय सहभाग नोंदवला.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahavikas Aghadi agitates against the government petrol diesel gas price hike