महाविकास आघाडीचा कॉन्फिडन्स वाढला; दोन लाखाच्या मताधिक्याचा डॉ.काळेंचा दावा

जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपने सहाव्यांदा रावसाहेब दानवे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार ठरलेला नाही. संभाव्य उमेदवार म्हणून माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर कल्याण काळे गाठीभेटी घेत आहे.
Mahavikas Aghadi Dr Kale claim of two lakh votes  jalna lok sabha election
Mahavikas Aghadi Dr Kale claim of two lakh votes jalna lok sabha electionSakal

फुलंब्री : जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपने सहाव्यांदा रावसाहेब दानवे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार ठरलेला नाही. संभाव्य उमेदवार म्हणून माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर कल्याण काळे गाठीभेटी घेत आहे.

उमेदवारी जाहीर होण्याआधीच महाविकास आघाडीच्या उमेदवारांना दोन लाखावून अधिक मताधिक्याने विजय होणार असल्याचा दावा डॉ.काळेंनी केला आहे. लोकसभेची निवडणूक जाहीर झाली, महायुती-महाविकास आघाडीने काही मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले, तर काही ठिकाणचे उमेदवार अद्याप ठरायचे आहेत.

पण त्याआधीच दोन्ही पक्षांकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे. मराठवाड्यातील जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपने सहाव्यांदा रावसाहेब दानवे यांना उमेदवारी दिली आहे. पण त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल?

हे अद्याप ठरलेले नाही.संभाव्य उमेदवार म्हणून माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर कल्याण काळे यांनी मतदारसंघात बैठका, मेळावे आणि भेटीगाठी सुरू केल्या आहेत. पण उमेदवारी जाहीर होण्याआधीच जालना लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार दोन लाखांहून अधिक मताधिक्याने विजयी होण्याचा दावा त्यांनी केला आहे.

भाजपच्या विरोधात जो बोलेल, त्याच्या मागे ईडी लावली जात असल्याची टीकाही काळे यांनी केली. भाजपने दुसऱ्या टप्यात जाहीर केलेल्या यादीत मराठवाड्यातील जालना, बीड, लातूर आणि नांदेड या चार मतदारसंघांचा समावेश होता. जालना लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रावसाहेब दानवे यांनी प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली आहे.

दुसरीकडे महाविकास आघाडीने मात्र अद्याप उमेदवाराची घोषणा केलेली नाही. संभाव्य उमेदवार म्हणून काळे मतदारसंघात फिरत असून, भाजपवर टीका करताना दिसत आहेत.भारतीय जनता पक्ष केवळ दोन धर्मात, जातीत तेढ निर्माण करण्याचे काम करत असून,

ईडीचा धाक दाखवून इतर पक्षाच्या नेत्यांना धमकावत आहे. तू चूप बस नाहीतर तुला ईडी लावेल, असाच सगळा कार्यक्रम सुरू आहे. जनता दबावाच्या राजकारणाला आता भीक घालणार नाही, लोक उघडपणे भाजपच्या विरोधात उभे राहू लागले आहेत. त्यामुळे या वेळी जालना लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी तब्बल 2 लाख मतांनी विजयी होणार, असा दावाही कल्याण काळे यांनी केला आहे.

भाजप केवळ आश्वासन देत असून, विकासाच्या नावावर जनतेची दिशाभूल करीत आहे. दोन जातीत आणि धर्मात तेढ निर्माण करून भांडण लावण्याचे एकमेव काम सध्या देशात आणि राज्यात सुरू आहे.

इतर पक्षातील नेत्यांना ईडीचा धाक दाखवून पक्षांतर करून घेतले जात आहे. जनतेला आता हे सगळे माहीत झाले असल्याने जनता महाविकास आघाडीच्या बाजूने भक्कमपणे उभी असल्याचे काळे म्हणाले. रमजानचा महिना सुरू असल्याने मुस्लिम समाजाच्या गाठीभेटीवर डॉ. कल्याण काळे यांनी भर दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com