Radhakrishna Vikhe Patil: महायुतीच देईल मराठा समाजाला आरक्षण ; विखे पाटील यांची ग्वाही
Maharashtra Politics: राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तुळजाभवानी मातेच्या दर्शनानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्याची महायुतीची ग्वाही दिली. तसेच कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पामुळे २६ हजार हेक्टर क्षेत्राला पाणी मिळणार असल्याची माहिती दिली.
तुळजापूर : राज्यात मराठा समाजास आरक्षण देण्यासाठी महायुती प्रयत्नशील आहे. महायुतीच मराठा समाजाला आरक्षण देईल, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी (ता.११) दिली.