

Cultural Reunion: Rajasthani Mahila Mandal Honors 150 Daughters in Ambad
Sakal
अंबड : पुरुषोत्तम अधिक मासानिमित्त राजस्थानी महिला मंडळाच्या वतीने "धोंडा रो आगमन बाई- बेटीसा रो स्नेह मिलन हा कार्यक्रम मंगळवारी (ता.26) जालना जिल्हयातील अंबड शहरात उत्साहात संपन्न झाला. दीडशे लेकींना पारंपारिक धोंडे जेवण, वाण , आहेर भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.सकाळी रामपुष्प हॉटेल येथून झंवर मंगल कार्यालयापर्यंत पंजाबी ढोल- ताशांच्या गजरात शोभायात्रा काढून लेकींचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी महेश वंदना व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.जिल्हा माहेश्वरी महिला संघटनच्या जिल्हाध्यक्षा नूतन दाड, मंगल झंवर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात सांस्कृतिक व मनोरंजनात्मक,नाटिका, नृत्यसह आदीचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला मंडळाच्या सचिव संगीता लाहोटी, कोषाध्यक्षा शितल करवा, प्रकल्प प्रमुख प्रमिला लाहोटी,डॉ.सुषमा भाला, राजेश्री दरक,सीमा राठी , डॉ.अनुराधा गट्टानी,धनश्री जेथलिया, शिवकन्या गिल्डा ,वर्षा समदानी , जयश्री सोडाणी, प्रतीक्षा राठी यांनी परिश्रम घेतले.