

Construction Site Tragedy: Hyva Driver Booked After Operator Buried Alive in Mahur
Sakal
माहूर : माहूर तालुक्यातील जुनापाणी येथे एका कन्स्ट्रक्शन साईटवर मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून एका 35 वर्षीय ऑपरेटर चा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज शनिवारी (ता.2) सकाळी उघडकीस आली होती. सदरील प्रकरणी मयताचा भाऊ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हायवा चालका विरुद्ध रविवारी (ता.3) माहूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.