Mahur Renuka Mata Temple: माहूरगडावर रेणुकामातेची महापूजा; पावसातही भक्तिभावाने गड दुमदुमला
Mahur Temple: माहूरगडावर शारदीय नवरात्रोत्सवात पावसाच्या सरींमध्येही भक्तांनी रेणुकामातेच्या महापूजेसह दर्शनाचा आनंद घेतला. भजन, आरती, पारायण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी गड भक्तिमय वातावरणाने निनादला.
माहूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पवित्र पर्वात शनिवारी (ता. २७) संततधार पावसातही माहूरगड भाविकांच्या भक्तिभावाने दुमदुमून गेला. सकाळी श्री रेणुकामातेची महापूजा भक्तिपूर्ण वातावरणात झाली.