esakal | माहूरगडावरील दत्त शिखर संस्थानची अकरा लाख रुपयांची मदत
sakal

बोलून बातमी शोधा

माहूरगडावरील दत्त शिखर संस्थानची अकरा लाख रुपयांची मदत

नांदेड जिल्ह्यातील माहूरगडावरील श्री दत्त शिखर संस्थानच्या वतीने कोरोना ग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस अकरा लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. 

माहूरगडावरील दत्त शिखर संस्थानची अकरा लाख रुपयांची मदत

sakal_logo
By
बालाजी कोंडे

माहूर -  नांदेड जिल्ह्यातील माहूर गडावरील श्री दत्त शिखर संस्थानने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन करत असलेल्या उपाययोजनांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस (कोव्हिड १९) तब्बल अकरा लाख रुपयांची मदत केली आहे. मंगळवारी (ता. ३१) धनादेश श्री दत्त शिखर संस्थान येथे गडाचे महंत श्री मधुसुधन भारती महाराज यांच्या हस्ते तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला अनुसरून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी श्री दत्त शिखर संस्थानने ही मदत देत असल्याचे सांगितले. संस्थानने यापूर्वी विविध सामाजिक, शैक्षणिक, व आरोग्यविषयक कार्यामध्ये पुढाकार घेऊन मदत केली आहे. 

हे ही वाचा - श्री गुरुगोविंदसिंघजी स्मारक रुग्णालयासाठी तीन कोटीचा निधी मंजूर

बारा गरजू कुटुंबांना मदत
संस्थानच्या वतीने सोमवारी (ता. ३०) बारा गरजू कुटुंबांना माहूर येथे अन्नधान्य व किराणाचे वाटप श्री चिंतामन भारती महाराज यांच्या हस्ते केले. श्री दत्त शिखर संस्थानचे सचिव गणेश पाटील, कोषाध्यक्ष ॲड. निलेश पावडे, विश्वस्त डॉ. विश्वासराव माने, विश्वस्त धनंजय महाजन, विश्वस्त ॲड. आशिष देशमुख, विश्वस्त गोपाल भारती यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला. या वेळी व्यवस्थापक ॲड. सुदर्शन देशमुख, भागवत मस्के, यशवंत जाधव उपस्थित होते.

मानवतेच्या दृष्टीकोनातून मदत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला अनुसरून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी व सध्याची परिस्थिती पाहता प्रत्येक नागरिकाने मानवतेच्या दृष्टिकोनातून जमेल तशी मदत करून खारीचा वाटा उचलला पाहिजे, असे आवाहन माहूरचे तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी केले. 

हे ही वाचलेच पाहिजे - अत्यावश्यक सेवेसाठी नवीन हेल्पलाइन आणि ई-मेल कार्यान्वीत- एसपी विजयकुमार

सढळ हाताने मदत करा
कोरोना (कोविड - १९) विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत असून मुख्यमंत्री सहाय्यता निधी - कोविड - 19 हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याचा बचत खाते क्रमांक 39239591720 हा आहे. उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था, धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात त्या सर्व संस्था आणि नागरिकांनी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी - कोविड 19’ या नावाने सुरु करण्यात आलेल्या खात्यात सढळ हाताने मदतीची रक्कम जमा करावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. खात्याची माहिती खालीलप्रमाणे आहे. 
मुख्यमंत्री सहाय्यता निधी - कोविड 19, बँकेचे बचत खाते क्रमांक - 39239591720, स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023, शाखा कोड 00300, आयएफएससी कोड SBIN 0000300
सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून शंभर टक्के सूट देण्यात येते. 

 

loading image
go to top