
माहूर : साडेतीन शक्तिपीठांपैकी पूर्ण पीठ असलेल्या रेणुकादेवीचा माहूरगड नवरात्रोत्सवासाठी सज्ज झाला आहे. २२ ते १ ऑॅक्टोबर या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कालावधीत माहूरगडावर खासगी वाहनांना पूर्णतः बंदी घालण्यात आली असून १२० बसद्वारे प्रवाशांना गडावर येण्या-जाण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.