
Majalgaon Dam
sakal
माजलगाव : मराठवाड्यातील महत्त्वाचा जलस्रोत असलेला माजलगाव धरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ३१,३३५ क्युसेक वेगाने सिंदफणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यामुळे सांडस चिंचोली गावाचा संपर्क तुटला असून, गोदावरी व सिंदफणा नदीकाठच्या गावांमध्ये पुराची भीती वाढली आहे.