

Beed News
esakal
माजलगाव: उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, त्याचा परिणाम माजलगाव धरणातील पाणीसाठ्यावर होत आहे. सध्या धरणातून दिवसाकाठी सुमारे ०.५ दलघमी (दशलक्ष घनमीटर) पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याची माहिती धरण प्रशासनाने दिली आहे. वाढत्या तापमानामुळे पाण्याचा वेगाने होत असलेला अपव्यय प्रशासनासमोर आव्हान ठरत आहे.
सध्या धरणात सुमारे ४० टक्के पाणीसाठा शिल्लक असून, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर त्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्यावर भर दिला जात आहे.