माजलगाव नगराध्यक्ष निवडणुकीचा खेळ रंगला  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Majalgaon parishad...jpg

आमदार सोळंकेंनी गणित जुळवले तर; जगतापांची आकडेमोड सुरूच 

माजलगाव नगराध्यक्ष निवडणुकीचा खेळ रंगला 

माजलगाव (बीड) : नगर पालिकेच्या नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरु झाली असून बुधवारी (ता.२८) उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीकडे सात संख्याबळ असताना आमदार प्रकाश सोळंकेंनी शिवसेनेला सोबत घेऊन बहुमताचे गणित जुळविले आहे. तर भाजपच्या मोहन जगतापांची आकडेमोड अद्यापही सुरूच आहे. जगतापांच्या आघाडीचे दोन, भाजपचा एक नगरसेवक राष्ट्रवादीच्या गळाला लागल्याचे खात्रीलायक सूत्राने सांगितल्याने काठावरचे बहुमत झाले आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

कोट्यावधीच्या भ्रष्टाचार प्रकरणी नगराध्यक्षांसह दोन मुख्याधिकारी, लेखापाल यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यामुळे माजलगाव नगर पालिका राज्यभर चर्चेत आली होती. सतत तीन महिने गैरहजर राहिल्याच्या कारणावरून जिल्हाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष सहाल चाऊस यांना बडतर्फ केले. यामुळे रिक्त झालेल्या नगराध्यक्ष पदासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. बुधवार (ता.२८) पासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली असून गुरुवार शेवटचा दिवस आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

पालिकेत राष्ट्रवादी सात, जनविकास आघाडी आठ, भाजप पाच, शिवसेना दोन, एमआयएम एक असे एकूण २३ संख्याबळ असल्याने नगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी १२ नगरसेवकांची आवश्यकता आहे. नगराध्यक्ष करण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके, भाजपचे मोहन जगताप यांनी कंबर कसली आहे. आमदार सोळंकेंनी बुधवारी दिवसभर नगरसेवकांची बैठक घेऊन बहुमताचा आकडा जवळपास जुळवला आहे. शिवसेनेच्या दोन नगरसेवकांसह आघाडीचे दोन, भाजपचा एक नगरसेवक गळाला लावल्याची सूत्राची माहिती असून जगतापांची आकडेमोड सुरु आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

चाऊस गट अलिप्त 
नगराध्यक्षपदावरून पायउतार झालेले सहाल चाऊस यांच्याकडे चार संख्याबळ असून सध्यातरी ते अलिप्त आहेत. यात तालेब चाऊस नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असून मोहन जगतापांनी पुन्हा त्यांना साथ दिल्यास ऐनवेळी चित्र पालटण्याची शक्यताही नाकारता येत नाही. 

(संपादन-प्रताप अवचार)